समता कार्यक्रमानिमित्त जात पडताळणीबाबत वेबिनारद्वारे माहिती  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त आज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांच्या वतीने गुगल मीट, फेसबुक लाईव्ह, युटयुव वर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्रीमती छाया गाडेकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन कवले यांनी जिल्हयातील उपस्थितांना जात पडताळणीच्या संदर्भात येणा-या समस्याबाबत ऑनलाईन अर्ज कसा भरावा, त्रुटींची पुर्तता कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली.

          नागरिकांकडून उपस्थित केलेल्या शंकेचे देखील समाधान करण्यात आले. ११ वी व १२ वी मध्ये विज्ञान शाखेत शिकत असलेल्या व व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या सर्व विदयार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळेत जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. जेणेकरुन विदयार्थी, पालक यांना प्रवेश घेताना धावपळ होणार नाही आणि कार्यालयावर ताण येणार नाही याची दक्षता जिल्हयातील सर्व विदयार्थी व पालकांनी घ्यावी असे आव्हाण जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कडून करण्यात आले आहे. या वेबीनार साठी जिल्हयाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने विदयार्थी, पालक, व नागरिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here