समता कार्यक्रमानिमित्त कल्याण श्रावस्ती यांचे महात्मा फुले यांच्यावर व्याख्यान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा परिषदेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे जीवनचरित्र व सामाजिक कार्य याबाबत कृषी अधिकारी तथा व्याख्याते कल्याण श्रावस्ती यांचे व्याख्यान झाले.

या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारती विद्यापीठ, सोलापूर येथील विद्यार्थिनी मनीषा चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर एकपात्री अभिनय सादर केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन कवले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, भारती विद्यापीठ सोलापूर येथील कर्मचारी, प्रकल्प अधिकारी व समतादूत उपस्थित होते.

            प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (शिक्षण) सुहास गुरव यांनी केले तर आभार मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी मानले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर व वालचंद कॉलेज समाजकार्य विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता वालचंद कॉलेजच्या प्रांगणात संविधान जागर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांमध्ये  संविधानाच्या प्रास्ताविकेचे  सामुहिक वाचन व संविधानाविषयी मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  कार्यक्रमात सहभागी व्हावे.  कार्यक्रम हा https://youtu.be/VHyJ4lFBj5Y  या  यु ट्यूब लिंकवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. जास्तीत  जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.आढे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here