सफाळे पोलीस ठाणे अज्ञात मृत देहाची ओळख पटण्या कामी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सफाळे पोलीस ठाणे
अज्ञात मृत देहाची ओळख पटण्या कामी

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सफाळे :- दिनांक ९ जुलै २०२१ रोजी दुपारी अंदाजे ३ – १० वाजता मौजे वेढी पोस्ट टेंभिखोडावे ता,जि पालघर. येथील तलावातील मासे यांना खाद्यान्न टाकण्यासाठी सागर अशोक घरत वय वर्षे २८ राहणार वेढी हे गेले असताना, त्यांना तलावात एक अनोळखी पुरूष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला असताना, सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे अपघाती मृत्यू रजि,न ०६ / २०२१ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, सदर अपघाती मृत्यूचा तपास सफाळे पोलीस ठाणे. प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बी के चेमटे पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहे. मृत व्यक्तीचे वर्णन / फोटो खालील प्रमाणे आहे.वय अंदाजे ५८ ते ६० वर्षे, उंची ५ फूट ५ इंच, दाढी वाढलेली सफेद, डोक्यावर केस, नाक सरळ, अंगात सफेद मळकट, अरेंज कॉलर असलेला हाफ टी शर्ट, समोरील डाव्या बाजूस मराठी मध्ये रिलायन्स एनर्जी स्थानिक लोक अधिकार समिती, वाघाचे चिन्ह, उत्तर विभाग सरचिटणीस श्री प्रदीप बोरकर असे अॉरेंज कलर मध्ये लिहिलेले दिसत आहे. सदर व्यक्ती बद्दल कोणासही माहिती असल्यास / मिळाल्यानंतर सफाळे पोलीस ठाणे मोबाईल नंबर ८६६९६०४०३७ किंवा ८८५०६३१५५९ वर संपर्क करावा असे सफाळे पोलीस ठाणे येथून सांगण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here