सनराईज पब्लिक स्कूल, शेळवे येथे शौर्यचक्रप्राप्त शहीद जवान कुणालगिर गोसावी यांची जयंती उत्साहात साजरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(देशभक्ती, त्याग, बलिदान आणि शौर्याचं प्रतिक म्हणजे शहीद मेजर कुणालगिर गोसावी आहेत! :प्रा. समाधान गाजरे.)

आज आपल्या सणराईज पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेत शौर्य चक्र प्राप्त शहीद मेजर कुणालगिर गोसावी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, सर्व शिक्षकांच्या आणि विध्यार्थ्यांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले, प्रसंगी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. गोरे मॅडम यांनी शहीद जवान कुणालगिर गोसावी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी शहिद मेजर कुणालगिर गोसावी यांच्या शौर्याच्या आठवणी जागृत केल्या, घरात सर्व सुख पायाशी लोळण घालत असताना,आर्थिक सुबत्ता असतानाही देश सेवेच्या व्रताने झपाटलेली ध्येयवेढी मानसंच असा अचाट पराक्रम करून जातात, त्यातीलच एक द्येयवेढं व्यक्तिमत्त्व म्हणजे मेजर कुणालगिर गोसावी आहेत, त्यांच्या स्मृतीतून त्याग, बलिदान,देशभक्ती आणि शौर्य इत्यादी ची प्रेरणा घेता येते, अखंड तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शहीद मेजर कुणालगिर गोसावी हे प्रेरणा आणि श्रद्धास्थान आहे असं मत यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी व्यक्त केलं,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकारी शिक्षक मोहन गायकवाड यांनी केलं!

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रशालेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी परिश्रम घेतले, तसेच इतर सहकार्य प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक यांनी केलं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here