सतनाम चौक येथे समाजकल्याण विभागातील शासकीय योजना व महामंडळाच्या कर्ज योजनांच्या शिबीराचे आयोजन -आ. प्रणिती शिंदे यांचा उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

सोलापूर : आ. प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून समाजकल्याण विभाग महामंडळाच्या विविध योजना व लोन शिबीराचे आयोजन शनिवार, दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले आहे. सदरचे शिबीर हे सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सतनाम चौक, कबड्डी मैदान, लष्कर, सोलापूर येथे होणार आहे.

या शिबीरामध्ये 1) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, 2) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, 3) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, 4) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, 5) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, 6) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, 7) बार्टी अंतर्गत येणारे विविध योजना या समाजकल्याण विभागाच्या विविध योजना व लोन यांचा समावेश आहे. याकरीता लागणारे आवश्यक ते कागदपत्रांची तपासणी करून लवकरात लवकर लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here