श्री संत दामाजी साखर कारखान्यावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४।३० वाजता मंगळवेढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्री देवर्षी साहेब यांचे अध्यक्षतेखाली  कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले।  उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी केले।  सदरच्या मार्गदर्शन शिबीरामध्ये मुख्य न्यायाधिश श्री देवर्षी साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाल कि, प्रत्येक नागरिकाला कायद्याने अधिकार असतो।  झोपलेल्या व्यक्तीला कायदा कधीच मदत करीत नसतो तर जे सतर्क असतात अशांना कायदा मदत करीत असतो। कामगारांसाठी अनेक कायदे आहेत परंतु त्याचे ज्ञान कामगारांना असणे महत्वाचे आहे। त्यासाठी अशा शिबीरांचे आयोजन करुन कामगारांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे।    कामगार कामावर असताना अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंंबियांना उदरनिर्वाहासाठी संस्थेकडून नुकसान भरपाई मिळविता येते।  विधी सेवा प्राधिकरणाकडून दुर्बल घटकांना ज्यांचे उत्पन्न तिन लाखाच्या आतमध्ये आहे अशांना मोफत कायदेशिर सल्ला, वकीलाची मोफत नेमणूक करुन न्याय दिला जातो।

वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड। लवटे म्हणाले, कामगार म्हणजे संस्थेचे हात असतात।  हे हात व्यवस्थीत चालले तर संस्था व्यवस्थीत चालते।  कामगारांनी कामावर गर्व न करता संस्था चांगली कशी चालेल हे पाहिले पाहिजे। कामगारांना असणारे हक्क हे कामगार विषयक कायद्यात नमूद आहेत। याचे ज्ञान कामगारांनी करुन घ्यावे। बालकामगार प्रतिबंधात्मक कायदयानुसार १८ वर्षाखालील  कामगारांना कामावर ठेवता येत नाही। याचे पालन संस्थेने करणे गरजेचे असते। यांत्रीक कामगार, आॅफिस कामगार, वाहतूक करणारे कामगार अशी कामगारांची वर्गवारी असलेचे त्यांनी  सांगीतले।
याप्रसंगी सरकारी वकील अॅड। बनसोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कामगार कायदे याविषयीचे पत्रक उपस्थित मान्यवरांचे हस्ते कर्मचा-यांना वाटप करण्यात आले।
या मार्गदर्शन शिबीरप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री भारत बेदरे, बसवराज पाटील,  रेवणसिध्द लिगाडे, दयानंद सोनगे, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, दादासाहेब दोलतडे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सरकारी वकील श्री बनसोडे, मंगळवेढा वकील असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड। लवटे, अॅड। बामणे, अॅड। गायकवाड, अॅड। पवार, अॅड। कोळेकर, अॅड।दुधाळ, अॅड। मर्दा, अॅड। मोरे, अॅड। भुसे  तसेच कारखान्याचे चिप‹Š इंजिनिअर श्री धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट श्री रमेश जायभाय, चिफ अकौंटंट श्री रमेश गणेशकर, मुख्य शेती अधिकारी श्री कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधिक्षक श्री दगडू फटे, पर्चेस आùफिसर श्री येताळा सावंजी, स्टोअरकिपर श्री उत्तम भुसे, ई।डी।पी।मॅनेजर श्री मनोज चेळेकर, गोडावूनकिपर श्री विश्वास पवार, लेबर आॅफिसर आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर श्री प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी श्री लक्ष्मण बेदरे, सर्व विभागप्रमुख, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते।
या शिबीराचे समारोपाप्रसंगी उपस्थितांचे आभार संचालक श्री रेवणसिध्द लिगाडे यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here