श्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

सोलापूर // प्रतिनिधी

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मिलरोलरचे पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यांत आले. सन 2021-22 या गळीत हंगामात सहा लाख ऊस गाळप करण्याचा मानस असलेचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी सदर प्रसंगी सांगितले. येणा­या हंगामाकरिता कारखान्यांतील सर्व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी आज मिल रोलरचे पूजन करण्यांत आले. जास्तीत जास्त शेतक­यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे यासाठी कारखाना ऑक्टोंबर पासुन सुरु करण्यात येणार असुन सक्षम अशी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा उभारण्यात आली आहे.
दामाजी कारखान्याचे कामकाज कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन आमदार समाधान दादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरु असुन कारखाना कार्यक्षमतेने चालवून चांगली रिकव्हरी मिळावी यासाठी अधिकारी,कर्मचा­यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले.

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक राजेंद्र दामोदर सुरवसे, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, मारुती लिंगाप्पा थोरबोले, रामकृष्ण जोतीराम चव्हाण, सुरेश बापू भाकरे, तसेच भारत निकम यांचेसह सर्व खातेप्रमुख, वक्र्स मॅनेंजर- गणपत घाडगे, चिफ केमिस्ट- मोहन पवार, चिफ इंजिनिअर- प्रविण मोरे, चिफ अकौंटंट- रमेश गणेशकर, स्टोअर किपर- उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी- लक्ष्मण बेदरे, लेबर ऑफिसर- आप्पासाो शिनगारे, कार्यालय अधिक्षक – दगडू फटे यांचेसह ऊस वाहतुक ठेकेदार, कामगार संघटना, पतसंंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here