श्री संत दामाजी कारखान्याचा ३० वा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन- श्री शिवानंद पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ करिता ३० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि।१७/१०/२०२२ रोजी सकाळी ११।३० वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली। गळीत हंगामाचा शुभारंभ वासकर फडाचे फडप्रमुख ह।भ।प। गोपाळआण्णा तुकाराम वासकर महाराज, तसेच जेष्ठ सभासद शेतकरी श्री रमेश किसनलाल मर्दा, श्री मनोहर गंगाराम कलुबर्मे, श्री जगन्नाथ बिराप्पा कोकरे, श्री दादा धोंडीबा बंडगर, श्री भिमराव शंकर मोरे, श्री कृष्णदेव केराप्पा मासाळ यांच्या शुभहस्ते होणार असुन कारखान्याचे माजी चेअरमन मा।प्रा।श्री। शिवाजीराव बाजीराव काळुंगे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी कारखान्याचे माजी चेअरमन अùड।श्री। नंदकुमार पवार, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री रामकृष्ण नागणे, कारखान्याचे माजी व्हा।चेअरमन श्री रामचंद्र वाकडे, माजी संचालक श्री यादाप्पा माळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। गळीत हंगाम शुभारंभाचे निमित्ताने सकाळी १०।३० वाजता कारखान्याचे संचालक श्री गोपाळ दगडू भगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ। रिना गोपाळ भगरे या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आलेचे श्री।शिवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले।
गळीत हंगामाची पूर्ण तयारी झाली असून कार्यक्षेत्रामध्ये आठ ते नऊ लाख मे।टन ऊस उपलब्ध असून संचालक मंडळाने या गळीत हंगामासाठी ६ लाख मे।टन गाळपाचे उदिष्ठ् ठेवलेले आहे। यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कारखान्यावर आलेली असुन मशिनरीच्या सर्व चांचण्या होवुन गाळपासाठी मशिनरी तयार आहे। सभासद-शेतकरी यांचे सहकार्य व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानामुळे या गळीत हंगामामध्ये गाळपाचे उद्षि्ठ निश्चीतच पार पडणार आहे।  तरी सर्व सभासद, शेतकरी यांनी आपला ऊस संत दामाजी कारखान्यास गळीतास देवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी केले। सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा।श्री।तानाजी खरात। संचालक श्री।पी।बी।पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, सुरेश कोळेकर, तानाजी काकडे यांचेसह कार्यकारी संचालक श्री।सुनिल दळवी व सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here