श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा सन 2022-23 गळीत हंगामाचा 41 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोमवार दि. 26/09/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता या शुभ मुहूर्तावर श्री संत तुकाराम महाराज याचे 10 वे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहुचे माजी अध्यक्ष ह.भ.प. श्रीगुरू बापुसाहेब महाराज देहूकर यांचे शुभहस्ते पुजन स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री.बी.पी. रोंगेसर व त्यांच्या सुविद्य पत्नी, कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.सौ. प्रेमलता रोंगे या उभयतांचे शुभहस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
या प्रसंगी ह.भ.प. श्रीगुरू बापुसाहेब महाराज देहूकर यांनी आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठा आध्यात्मिक शक्ती असून श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू संताचे आशिर्वाद लाभले आहेत. कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नात असुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे त्यांनी सांगितले व गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या
याचवेळी कारखान्याच्या नॅशनलहेवी या जुन्या मिलचे रोलर पुजन संचालक श्री प्रविण विक्रम कोळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाले
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्व श्री. संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, सौ. कविता रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडाले, कार्यलश्री संचालक तुकाराम मस्के सर, एम.एस.सी.बॅंक आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थित होते.