श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन! (सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन!

(सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन)

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल परिवाराचे नेते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२/२३ ४१वा गळीत हंगामाचा बॉयलरअग्निप्रदिपन समारंभ संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू माजी अध्यक्ष ह.भ.प.श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते होणार असून होम हवन पूजा गोपाळपूर स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव बब्रुवान रोंगे व त्यांच्या पत्नी प्रेमलता रोंगे या उभयतांच्या शुभहस्ते सकाळी ९:०० वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला आहे .तरी या शुभ मंगलप्रसंगी सर्व सभासद शेतकरी, संचालक मंडळ व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here