श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार

 

पंढरपूर // प्रतिनिधी 

रविवार दि ०४/०७/ २०२१ रोजी पुणे येथील संजय नारायण पवार यांनी श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस ७२८ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा नग २ भेट दिल्या. त्यावेळी संजय नारायण पवार यांचा सत्कार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे हस्ते श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची दैनंदिनी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला .

दि.२१/०६/२०२१ जेष्ठ वद्य ११ योगीनी एकादशीनिमीत्त दत्तात्रय हरीभाऊ जाधव रा.पट्टी वडगांव ता.आंबेजोगाई जि.बीड यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रू.१,००,००० / – अक्षरी एक लाख रूपयांची देणगी दिली होती . त्यावेळी दत्तात्रय हरीभाऊ जाधव यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते श्री ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.त्यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, देणगी विभाग प्रमुख संजय कोकीळ व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here