श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रासाठी बेंगलोर येथील भाविकांकडून 10 ची देणगी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर  दी.१७  श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला बेंगलोर येथील भाविक श्रीमती रोहिणी नंदन निलेकणी यांनी अन्नदानासाठी रक्कम रू.10.00/- लक्ष रूपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने लेखा अधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या हस्ते येथोचित मानसन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे विभाग प्रमुख श्री.विनोद पाटील व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

मंदिरे समितीच्या वतीने श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दैनंदिन दुपारी 12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत मोफत अन्नदान करण्यात येते. त्याचा दैंनंदिन 1200 ते 1500 भाविक लाभ घेतात. सदर अन्नछत्रात अन्नदान करण्यासाठी श्रीमती रोहिणी निलेकणी, बेंगलोर यांनी देणगी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here