श्री विठ्ठल अण्णा भाऊ पॅनलच्या सर्वच उमेदवारांना ग्रामीण भागातून उस्फुर्त प्रतिसाद!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कैलास वासी औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू, युवराज दादा पाटील यांच्या श्री विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना खर्डी, सोनके कोर्टी येथील गावभेट दौऱ्यातील सभांना, सर्व जुन्या-जाणत्या सभासद वर्गांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून यामध्ये युवराज दादा तुमचेच
पॅनल निवडून येणार असल्याचे सर्व ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठ सभासद वर्गातून बोलले जात आहे. आज झालेल्या, खर्डी, सोनके, व कोर्टी येथील जाहीर गावभेट दौऱ्यामध्ये, युवराज दादा पाटील एडवोकेट गणेश पाटील एडवोकेट दीपक पवार, यांच्या श्री विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी वरील तिन्ही नेते मंडळींनी सर्व सभासदांना केले. यावेळी मोठ्या संख्येने या सर्व बैठकांना जनसमुदाय व सभासद कामगारांनी हजेरी लावल्यामुळे येणाऱ्या दिनांक सहा जुलै निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here