श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 1,51,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न! मागील 27दिवसात कारखान्याने 1,56,287 मे. टन उसाचे गाळप केले:आ प्रशांतराव परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 1,51,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न!

मागील 27दिवसात कारखान्याने 1,56,287 मे. टन उसाचे गाळप केले:आ प्रशांतराव परिचारक

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022-23 मध्ये उत्पादित झालेल्या 1,51,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्हा.चेअरमन मा.श्री कैलास खुळे आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदि उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2022-23 हा दि.26/10/2022 रोजी सुरु झाला असून कारखान्याने 27 दिवसात -1,56,287 मे.टन ऊसाचे गाळप करुन 1,51,111 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याच बरोबर कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा 11.16 टक्के असून सरासरी साखर उतारा 10.13 टक्के आहे. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच कारखान्याचे कामकाज सुरु असून त्याचप्रमाणे पुढेही अखंडीतपणे सुरु राहील. गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रु.2400/- प्रमाणे अदा केला असून दि. 15-11-2022 पर्यंतची ऊस बिले अदा केलेली आहेत. याचप्रमाणे पुढील ऊस बिलेही अदा करणार आहोत. कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये प्रतिदिन सरासरी 7000 मे.टनाने गाळप करणार आहोत. या हंगामापासून कारखान्याचा आसवनी प्रकल्पही 90 के.एल.पी.डी. क्षमतेने चालवित आहोत.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, या हंगामात सिरप ते इथेनॉलचे उत्पादन नुकतेच सुरु झालेले आहे. त्यामुळे कारखान्याच्या गाळपामध्ये वाढ होवून कारखान्याचे ऊस गाळप वाढणार आहे. या हंगामातही कारखान्याचे उच्चांकी गाळप, उच्चांकी साखर उत्पादन करण्याचे उदीष्ट आहे. तसेच या हंगामापासून नव्याने आसवनी प्रकल्पाच्या स्पेंटवॉश पासून पोटॅश निर्मीती करीत आहोत.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here