श्री पांडुरंग सहकारी ची उत्तुंग भरारी १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप तर १३,७५,५५५/- साखर पोत्याचे पुजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(सर्व शेतकऱ्यांच्या ऊस 10 मेपर्यंत गाळप करणार:-डॉ. यशवंत कुलकर्णी)

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे रेकॉर्ड ब्रेक उच्चांकी 12,00,000/- लाख मे. टन गाळप व विक्रमी 13,75,555/- साखर पोत्याचे पूजन
चेअरमन मा.आ. प्रशांतराव परिचारक यांचे अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक
डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर या कारखान्याने आज पर्यंतचे गाळपामधील व साखर पोती उत्पादनामधील सर्व उच्चांक मोडुन 13 लाख 75 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक यांचे अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक डॉ श्री यशवंत कुलकर्णी यांचे शुभहस्ते आणि सर्व संचालक मंडळ व खाते प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी कारखान्यामध्ये झालेल्या विक्रमी गाळपाबद्दल व विक्रमी साखर उत्पादनाबद्दल कारखान्याचे सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी वाहातुक करणारे मुकादम व मजुर, कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. कैलासराव खुळे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी व सर्व खातेप्रमुख, त्यांचबरोबर सर्व कर्मचारी यांचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद दिले. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बरेच साखर कारखाने बंद झाले असून त्यांनी चालू गळीत हंगाम 2021 -22 आटोपला आहे. परंतु आपल्या कारखान्याच्या व्यवस्थापनावर असलेला ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासामुळे त्यांनी पांडुरंग साठी ऊस राखून ठेवला त्यामुळे कारखान्यास उच्चांकी गाळप करुन आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढता आले वास्तविक पाहता हा हंगाम सुरू करतेवेळी कारखाना सुमारे 15 एप्रिल पर्यंत चालेल असे वाटत होते परंतू एप्रिल संपत आला तरीही आपल्याकडे सुमारे 50,000 मे.टन ऊस शिल्लक आहे. त्याचबरोबर कारखान्याकडे असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा आज पर्यंत कारखान्याकडे टिकुन राहिली त्यामुळे आपणास सर्व उसाचे गाळप करणे शक्य होईल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नोंदणी केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप केल्यानंतरच कारखाना बंद करण्यात येईल. तरी कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हवालदिल होण्याची आवश्यकता नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी येणारी अडचण लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने मालक तोड करण्यासाठी तोडणी दर वाढवून दिला आहे. तसेच ऊस उत्पादकांनाही उशीरा येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन रक्कम रुपये 100/- प्रमाणे वाढ दिली आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. कैलासराव खुळे, संचालक श्री.दिलीप त्रिबंक चव्हाण, श्री.तानाजी मारूती वाघमोडे, श्री. बाळासो दादा यलमर, श्री. भगवान भिमराव चौगुले, श्री. लक्ष्मण गोरख धनवडे, श्री.भास्कर लक्ष्मण कसगावडे, श्री.भैरू संतु वाघमारे, श्री.गंगाराम गणपती विभुते, श्री.सुदाम बापू मोरे, श्री.विजय अगंद जाधव, श्री.हणमंत हरीदास कदम, श्री.किसन विठ्ठल सरवदे, सौ.संगिता शामराव साळुंखे,श्रीमती सुशिलाबाई मधुकर पाटील, कारखान्याचे प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर,चिफ अकौंटंट आर.एम.काकडे, डिस्टीलरी मॅनेजर आर.एस.पाटील को.जन मॅनेजर सचिन विभुते, सिव्हील इंजिनिअर एच.एस.नागणे, मटेरियल मॅनेजर एम.जी.देशपांडे, संगणक प्रमुख तानाजी भोसले, सहा.अधिक्षक बी.एस.बाबर व सभासद शेतकरी उपस्थित होते.


चौकट:-

चालू गळीत हंगाम 2021-22 मध्ये आजपर्यंत 12 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन 13 लाख 75 हजार 555 साखर पोती उत्पादित केली आहेत तसेच आपल्या साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा 11.46 टक्के इतका राहीला आहे. तसेच कारखान्याच्या कोजनरेशन पासुनही 6.86 कोटी युनिट विज निर्मिती केली आहे कारखान्याच्या आसवनी प्रकल्पातून आज अखेर 80 लाख लिटर अल्कोहोल उत्पादन केलेले आहे. गाळप हंगाम सुरू झालेपासुन कारखान्याने सर्व ऊस उत्पादकांची ऊस बिले वेळेत अदा केली आहेत. त्याचबरोबर तोडणी वहातुकदार यांची ही बिले अदा केलेली आहेत. आज रोजी कारखान्याकडे शिल्लक असणाऱ्या सर्व ऊसाचे गाळप 10 मे 2022 पुर्वी पुर्ण होईल

-डॉ.यशवंतराव कुलकर्णी
कार्यकारी संचालक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि.श्रीपूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here