श्री पांडुरंग कारखान्यामध्ये मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त 255 जणांचे रक्तदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामार्फत कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबीर, गणेश रुग्ण सेवा पंढरपूर येथे अन्नदान, पालवी येथे अन्नदान आणि गोपाळपूर वृध्दाश्रम येथे जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजीत करण्यात आले होते. मागील दोन वर्षाचा विचार केला असता कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमीत्त कोरोनाचा काळ असल्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ट दान असलेने सर्व कामगारांनी रक्तदान करावे असे आवाहण केले होते. त्यास कारखान्याच्या कामगारांनी प्रोत्साहन देवून रक्तदानामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेवून 255 कामगारांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे पंढरपूर येथील पालवी बाल संगोपन येथे विद्यार्थ्यांना अन्नदान केले. गणेश रुग्णसेवा या संस्थेमध्येही शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्नदान केले. गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे असलेल्या वृध्दांना अन्नदान करून चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी सांगितले की, मागिल दोन वर्षामध्ये कोरोना सारख्या रोगाने संपुर्ण देश ग्रासला होता त्यावेळी चेअरमनसाहेबांचा वाढदिवस साजरा करता आला नाही परंतू या वर्षी कोणतीही आपत्ती नसलेमुळे वाढ दिवसाचे औचित्य साधून समाजउपयोगी कार्य करता आले. पंढरपूर येथील अंध व अपंग मुलांना त्याचे भविष्य घडविण्यात हातभार लावणारी गणेश रुग्ण सेवा या संस्थेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करता आले तसेच एड्स बाधीत मुलांबरोबरच निराधार व निराश्रीत लोकांचे निस्वार्थपणे संभाळ करणारी पालवी बाल संगोपन या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही अन्नदान करता आले . जिवनाच्या उतारवयात लोकांना जिवन जगणेसाठी प्रोत्साहन देणारी गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम या संस्थेतील लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे किट देण्यात आले. श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या शिकवणी प्रमाणे कारखान्यामार्फत कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस समाजउपयोगी कार्य करुन साजरा करता आला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, वर्क्स मॅनेजर श्री आर.बी. पाटील, प्रोडक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर श्री संतोष कुमठेकर, चीफ अकौंटंट श्री रविंद्र काकडे, ऊस विकास अधिकारी श्री सोमनाथ भालेकर, सिव्हील इंजिनिअर श्री हणमंत नागणे, को-जन मॅनेजर श्री सचिन विभुते, डिस्टिलरी मॅनेजर श्री आर.एस.पाटील, हेड टाईम किपर श्री सोपान कदम, कॉम्प्युटर इंचार्ज श्री तानाजी भोसले, इन्स्ट्रुंमेंटेंशन मॅनेजरश्री समीर सय्यद, सह कार्यालयीन अधिक्षक श्री भिमराव बाबर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here