श्री पांडुरंग कारखान्याचे को-जन मॅनेजर श्री सचिन विभुते यांना बेस्ट को-जन मॅनेजर पुरस्कार जाहीर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग कारखान्याचे को-जन मॅनेजर श्री सचिन विभुते यांना बेस्ट को-जन मॅनेजर पुरस्कार जाहीर

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे को-जनरेशन मॅनेजर श्री सचिन विभुते यांना को-जन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा सन – 2021-22 या वर्षातील देशपातळीवरील बेस्ट को-जन मॅनेजर म्हणून पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण मुंबई येथे दि. 27/08/2022 रोजी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते व मा.श्री. शरदचंद्रजी पवार यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.
श्री सचिन विभुते हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये मागील 18 वर्षापासून काम करीत असून त्यांनी केलेल्या कामगिरीच्या व त्यांनी दाखविलेल्या कौशल्याच्या जोरावर हा पुरस्कार प्राप्त झाला असून कारखान्यामध्ये उभारलेल्या को-जनरेशन प्रकल्पाच्या सुरुवातीपासुनच त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. को-जनरेशनमध्ये काम करीत असताना जास्तीत जास्त विज निर्मीती करुन जास्तीचे विज युनिट निर्यात करण्यावर त्यांनी भर दिला आहे. याचीच दखल को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी घेवून त्यांना देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जन मॅनेजर या देशपातळीवरील पुरस्काराने सन्मानीत करणेत येणार आहे.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब, व्हा.चेअरमन श्री. कैलास खुळे सर, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब व वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील साहेब व अधिकारी,कर्मचारी यांनी दिलेल्या प्रोत्सहनामुळे व त्यांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असुन याचे सर्व श्रेय कारखान्यातील माझे सहकारी व कामगार यांचे असलेचे श्री सचिन विभुते यांनी स्पष्ट केले
श्री सचिन विभुते यांना बेस्ट को-जन मॅनेजर हा पुरस्कार मिळालेबद्दल यांचे कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे व संचालक तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी, कामगार यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here