श्री पांडुरंग कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानावर 50 लाख ऊस रोपांचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या फेब्रूवारी महिन्यापासून पुढे लागण करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इंन्स्टीटयुट मांजरी बु.// पुणे यांनी मान्यता दिलेली सुधारित ऊस रोपे 50 टक्के अनुदानावर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते वाटप करणेत आली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे, संचालक मंडळ सदस्य, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व शेतकरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, आपल्या कारखान्याचा ऊस लागवड हंगाम साधारणपणे जून, जुलै या महिन्यात सुरु होऊन कारखान्याला आवश्यक असणाऱ्या एकूण ऊसापैकी सुमारे 70 % ऊस लागवड ही या महिन्यात होते. त्यामुळे कारखान्याचा तोडणी प्रोग्राम राबवताना प्रत्येक वर्षी अडचण निर्माण होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणणेसाठी उशीर होतो. वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट मांजरी बुद्रूक पुणे यांनी शिफारस केलेली 50 लाख ऊस रोपे कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 50% अनुदानावर दि.25फेब्रूवारी 2022 पासून पुढे ऊस लागवड करतील त्यांना देणेत येतील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बेणे रोपे उधारीणे देवून त्यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आलेनंतर रोपांची रक्कम वसुल करणार आहोत. कारखान्याच्या या योजनेचा जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घेवून ऊस लागवड करावी असे आवाहन यावेळी करणेत आले .
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, चालु गळीत हंगाम सुरु होवून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या आडसाली ऊसाचे उशीरा गाळप झाल्याने त्याचा परिणाम कारखान्याच्या साखर उताऱ्यावर होवून साखर उतारा कमी मिळत आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाचा दर हा साखर उताऱ्यावर ठरत असल्याने कारखान्याचा साखर उतारा चांगला राहणेसाठी ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप होणे अत्यंत आवश्यक आहे. कारखान्याचा साखर उतारा चांगला राहील्यास कारखान्याच्या सभासदांना जास्तीचा ऊस दर मिळणार आहे. फेब्रूवारी, मार्च मध्ये ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा पुढील गाळप हंगाम 2022-23 मध्येच गाळप होणार असल्याने हा ऊस फक्त 12 ते 13 महिन्यांतच गाळपास येणार असल्याने त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत ऊस रोपांची लागण केल्यामुळे तुट आळे होण्याचे प्रमाण खुपच कमी होवून एकरी ऊसाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच अंतर मशागत, खते इत्यादीची बचत होवून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. आडसाली ऊसामध्ये अंतर पिक घेता येत नाही परंतु पूर्व व सुरु हंगामातील ऊस लागवडीमध्ये अंतर पिक घेता येते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुरु व पुर्व हंगामी ऊसाची लागवड करावी अशी माहिती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री.सोमनाथ भालेकर यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.दिलीप चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री.उमेशराव परिचारक, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री. लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री. शामराव साळुंखे, श्री.राणु पाटील, केन मॅनेजर श्री.संतोष कुमठेकर इ. उपस्थित होते.

कार्यकारी संचालक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here