क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे तसेच
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर तसेच
जिल्हा वुशू संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते ता.पंढरपूर प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आल्या. प्रारंभी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी मा.धारुरकर साहेब (सोलापूर) संस्थेचे जेष्ठ संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरचे चेअरमन मा.दिलीपआप्पा घाडगे, जेष्ठ संचालक अनिरुद्धभाऊ सालविठ्ठल यांचे हस्ते करण्यात आले.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य आर.डी शिनगारे यांनी केले.मार्गदर्शनपर भाषणामध्ये धारुरकर साहेब यांनी स्पर्धेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.