श्री डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त निरोगी आरोग्यासाठी श्रीपूर -अकलुज -श्रीपूर सायकल राईडचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त निरोगी आरोग्यासाठी श्रीपूर -अकलुज -श्रीपूर सायकल राईडचे आयोजन

सोलापूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग सायकल क्लब, श्रीपूर व कामगार कल्याण मंडळ, श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1/07/2021 रोजी मा. डॉ. श्री यशवंत शंकरराव कुलकर्णी , कार्यकारी संचालक श्री पांडुरंग स. सा. का. लि. श्रीपूर यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी श्रीपूर -अकलुज -श्रीपूर सायकल राईडचे आयोजन केलेले होते.

सदरची सायलक राईड ही कोवीड-19 चे सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आली होती व सहभागी सायकल राईडर्सना त्यासंबंधीच्या सर्व सुचना देवून सदरची सायकल राईड आयोजित केली होती. या प्रसंगी सायकल राईडचे उद्धाटन डॉ. सुधिर पोफळे, RB पाटील, अनंता कुलकर्णी, मारुती उपासे यांनी श्रद्धेय कै. सुधाकर पंत परीचारक (मालक) व पांडूरंग प्रतिमेचे पुजन केले व फ्लॅग दाखवुन सायकल राईडची सुरवात केली.
सदरची सायकल राईड ही पुढील मार्गानी पुर्ण झाली. श्री पांडुरंग स. सा. का. लि. श्रीपूर यांचे कारखाना मेन गेट येथून सकाळी 6.00 वा. सुरवात होवून थोरली चौकी – कॉलेज चौक – प्रतापसिंह चौक- मा. विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुल अकलुज येथे सकाळी 7.00 वाजता पोहचली व तेथे अल्पोपहार घेवून परत तेथून 7.30 वाजता परतीचा प्रवास महर्षी चौक- सदभाऊ चौक- जुने एस. टी. स्टँन्ड- टेंभुर्णी चौक- थोरली चौकी मार्गे श्री. पांडुरंग कारखाना गेट समोर सायकल राईड समाप्त झाली.
सदर सायकल राईड मध्ये 125 सायकल राईडर सहभागी झाले. यामध्ये अकलुज, पंढरपुर, माळशिरस, पेहे, जाधववाडी,जळोली येथील सायकल राईडरनी सहभाग नोंदवला. या मध्ये 5 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील राईडर सहभागी झाले होते.
अकलुज येथील रॉयल रायडरचे अध्यक्ष मा.श्री.धैर्यशिल (भैय्यासाहेब) मोहीते-पाटील यांनी त्यांच्या सर्व सायकल रायडर टिमने सदिच्छा भेट देवुन मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. सहभागी झालेल्या सायकल राईडरचे अभिनंदन व प्रमाणपत्र वाटप सत्कार समारंभाचे आयोजन केले जाणार आहे.

सायकल राईड यशस्वीपणे पार पाडण्यसाठी डॉ. सुधिर पोफळे, BS बाबर, डॉ. प्रमोद पवार, सचिन विभुते, राहुल शिवाजी साठे, राजु पवार, भुषण धाईंजे, ओंकार पवार, ज्ञानेश्वर खुळे, आबा ईगंळे, जगदिश अग्निहोत्री, प्रविण शिंदे, भारत जाधव, श्रीकृष्ण पुजारी, राजशेखर विभुते, श्रीकांत सहस्त्रबुध्दे, नागनाथ वाघमारे,बाहुबली वठारे, अजिम मुलाणी, बाहुबली हासुरे, अरविंद लोंढे, अशोक बिरलिंगे, रमेश माने, सिंकदर डांगे, प्रसाद सुमंत, प्रदिप गाडे, चंद्रकांत थिटे यांनी मोलाची साथ दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here