श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

अकोला – अकोला शहरामध्ये गोरक्षण संस्थानच्या मागे, दत्त कॉलनी गोरक्षण रोड श्री गणेश राव पाटील लांडे यांच्या घराजवळ दि ९-११-२०२१ ते १६-११-२०२१ पर्यंत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व संगीतमय श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून गजानन विजय ग्रंथ पारायण व्यासपीठ नेतृत्व ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज नावकार यांचे असून भागवताचार्य ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन होणार आहे.कार्यक्रमांमध्ये सकाळी काकडा भजन, दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा राहील. कथा संचामध्ये विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, विलास महाराज कराड, प्रदीप महाराज गायकवाड, रामेश्वर महाराज गाडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर यांची उपस्थिती राहील. १६-११-२०२१ ला सकाळी होम विधी पार पडून कॉलनी मधून ग्रंथ दिंडी सोहळा निघणार आहे व सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प श्री अरुण महाराज लांडे पारस यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम व भाविकांच्या करता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी अकोला शहरातील जास्तीत जास्त भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा ही विनंती आयोजक मंडळातर्फे करण्यात आलेली आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here