श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा – तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे राष्ट्रीय  गुरव समाज महासंघाच्या वतीने संत काशीबा गुरव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराज यांचे समाधीस्थळ असून, या समाधीस्थळावर महाअभिषेक करून अभिवादन करण्यात आले.

संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संत  सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत.

राष्ट्रीय  गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या परमपूज्य श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथे सकाळी ठीक नऊ वाजता महाअभिषेकाचा समारंभ संपन्न झाला , त्याच्यानंतर  महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुतारी वादक गुरव (सातारा ) यांच्या तुतारी वादनाच्या नादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महासचिव मल्लिकार्जुन गुरव , सदस्य  चंद्रकांत गुरव , ह.  भ.  प.  देहूकर महाराज  , त्याचप्रमाणे राम कृष्ण गुरव गुरुजी (अकलूज) हरिभाऊ गुरव (माळुंग)  गोविंद गुरव ( मुंबई),  अंकुश गुरव (अहिरे गाव) , गणेश गुरव (अरण)  ह . भ . प . उंदरकर महाराज आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर येथे नुकत्याच पार पडललेया राष्ट्रीय  गुरव समाजाच्या अधिवेशनात  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून  50 कोटी रुपये या महामंडळाला देण्याचे आश्वासन दिल्यामुळे  शासनाचे यावेळी आभार मानण्यात आले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here