“शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेचे यश”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी व ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. मागील काही वर्षांपासून असलेल्या कोरोनाच्या आणीबाणी परिस्थितीत सुद्धा या परीक्षेतील विद्यार्थ्याना शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले.
या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील एकूण ४ विद्यार्थी पत्र यादीत आले असून. इयत्ता ५ वीतील विद्यार्थी कु.मिहीर मकरंद बडवे याने ३०० पैकी २१० गुण मिळवत गुणवत्ता यादीत येवून शिष्यवृत्ती मिळवत मोहोर उमटवली. त्याबद्दल प्रशालेतर्फे त्याचा सत्कार प्राचार्या सौ.सोनाली पवार व रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी करुन त्याचे मनभरून कौतुक केले. यावेळी विद्यार्थी मिहीर बडवे याचे पालक आई सौ.बडवे उपस्थित होत्या.
संस्थेचे चेअरमन श्री रोहनजी परिचारक यांनी मिहिरला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन करून कौतुकाची थाप टाकली. तसेच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्या दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here