शेतक-यांची ऊस बिले त्वरीत द्या; बळीराजा संघटनेची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतक-यांची ऊस बिले त्वरीत द्या; बळीराजा संघटनेची मागणी

सोलापूर // प्रतिनिधी

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. (बिजवडी) तालुका इंदापूर कारखान्याने गाळप हंगाम 2020- 21 मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 9 जुलै 2021रोजी कारखाना प्रशासन व तहसीलदार यांना ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचीच दखल घेत तहसीलदार, कारखाना प्रशासनयांनी बळीराजाचे पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये चर्चेतून मार्ग काढण्यासाठी कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सदरची सर्व ऊस बिले, पुरवठादार व शेतकरी यांच्या खात्यावर 31 जुलै पर्यंत वर्ग करीत आहोत असे ठोस लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्याने आजचे 22 जुलै चे हे आंदोलन ठिय्या आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येत आहे असे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर उपाध्यक्ष रामदास खराडे यांनी सांगितले…

कोरोना महामारी मुळे शेतकऱ्याला कुठल्या पिकाला दर नसल्यामुळे शेतकरी हा पूर्णत कोलमडून पडला आहे तरी शेतकरी बांधवांना ऊर्जा देण्यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या ऊसाचे हक्काचे बिल पाच ते सहा महिने कारखाना बंद होऊन सुद्धा मिळत नसेल तर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी वेळीच शेतकऱ्यांच्या त्यांना हक्कांचे पैसे द्यावेत

यावेळी कारखाना प्रशासनाचे सतीश चव्हाण तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास खराडे, शिवसेना माढा तालुका उपाध्यक्ष संतोष ढवळे, भाजप माढा तालुका उपाध्यक्ष मगनदास महाडिक, संघटक विठ्ठल मस्के, महादेव मदने, शिवाजी येवले पाटील टेंभुर्णी, अविनाश चोपडे, सोमनाथ चोपडे, विकास खराडे नगोर्लो, संतोष भानवसे ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here