शेतकऱ्यांच्या “भल्या”साठी”कामाला लागा”- नानाभाऊ पटोले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतकऱ्यांच्या “भल्या”साठी”कामाला लागा”- नानाभाऊ पटोले.

मुंबई येथील टिळक भवन येथे पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुंबईचे श्री.सुरेश शेट्टी यांच्यावर महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते नेमणुकीचे पत्र श्री. शेट्टी यांना प्रदान करण्यात आले. तसेच श्री.संजय कुमार चौगुले यांनाही कार्यालयीन प्रभारी पदाचे नेमणूक पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुढील आदेश येईपर्यंत प्रा. संग्राम चव्हाण यांनी सांभाळावी अशी सूचनाही करण्यात आली.याप्रसंगी किसान काँग्रेसचे उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना संबोधित करताना श्री.नानाभाऊ पटोले म्हणाले की 2014 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकां मध्ये शेतकऱ्यांनी भाजपा कडून दिल्या गेलेल्या खोट्या आश्वासनांना बळी पडून मतदान केले होते व त्यामुळेच देशात सत्तांतर घडले होते. परंतु भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा सपशेल अपेक्षाभंग केला. खतांच्या व कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्या . शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची, योग्य हमीभाव देण्याची मोदी सरकारची घोषणा हवेतच विरून गेली.बियाणे व इंधनाच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या.विजेचे दरातही दुप्पट वाढ झाली. शेतकऱ्यांचे उत्पन्न तर दुप्पट झालेच नाही मात्र शेतकऱ्याचं कर्ज मात्र चौपट वाढून बसलं. शेतकऱ्यां साठी कर्जमाफीची योजना अत्यंत गरजेची असताना त्याचा कुठेही विचार झाला नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही भरीव राजकीय धोरण आखले गेले नाही. राजकीय अनास्थे मुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून जगाचा पोशिंदा असणार्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ या सरकारच्या काळात आली. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असणार! अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रभारी श्री. नानाभाऊ पटोले यांनी किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर व कार्यकर्त्यांवर लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मोठी जबाबदारी असून तळा- गाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून,त्यांचे जागरण करून, त्यांना दिलासा देण्याविषयी आवाहन केले. आर्थिक व नैसर्गिक अरिष्टामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असलेल्या तमाम शेतकऱ्यांना त्यांचे सर्व प्रश्न काँग्रेस पक्ष आस्थेने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील याविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने आश्वस्त करून त्यांचा धीर खचू न देता त्यांच्या आत्महत्या थांबवणे हेही आपलं आद्य कर्तव्य असल्याचं व आता देशात *काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचं* श्री. नानाभाऊ पटोले यांनी निक्षून सांगितलं. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात काँग्रेससाठी पोषक वातावरण तयार झाले असून सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून मरगळ झटकून “कामाला लागा” असं जाहीर आवाहन श्री.पटोले यांनी याप्रसंगी केले.

चौकट

महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस “ऍक्टिव्ह मोड”वर!- श्री. प्रकाश घाळे

देशातील लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली राजस्थान,तेलंगणा, मध्य प्रदेश वगैरे राज्यांमधील सुनियोजित प्रचाराच्या झंजावातानंतर आता काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश किसान व शेतमजूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते “ॲक्टिव्ह मोडवर”आहेत. व आम्ही शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करत आहे.

– श्री प्रकाश घाळे, राष्ट्रीय समन्वयक अखिल भारतीय किसान काँग्रेस.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here