शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा! ,प्रा.संग्राम चव्हाण अवकाळी पावसा मुळे द्राक्षबागांचे घड जिरले (सलग तिसऱ्या वर्षी द्राक्षबागा “फेल”!) (बळीराजा कर्जाच्या विळख्यात!) (इतर पिकांचेही मोठे नुकसान) (सोलापूर जिल्ह्यातही आत्महत्यांचे सत्र चालू होईल!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्याच्या रोजगार निर्मिती क्षेत्रामध्ये सर्वात मोठे योगदान देणाऱ्या द्राक्ष बागांना डाऊनी, मुली,फळकुज फुलकुझ या रोगांच्या प्रादुर्भावामुळे तसेच पावसाच्या पाण्या मुळे अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा होऊन नेमक्या द्राक्ष घडांची वीण होण्याच्या काला- वधीमध्ये घड विरघळण्याची समस्या निर्माण झाली.गतवर्षी द्राक्ष पिक विक्रीसाठी तयार असताना अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष घड नासून गेल्यामुळे एकही द्राक्ष घड विकता न आल्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. त्या आगोदरच्या वर्षीही कोरोना निर्बंधांमुळे द्राक्षाचे दर कोसळले होते. सलग तिसऱ्या वर्षी फटका बसल्यामुळे द्राक्ष बागायतदार पिकांवर केलेला खर्च सुद्धा न निघाल्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकून देशोधडीला लागल्याचे सर्रास चित्र आहे. द्राक्ष पिक उभा करताना मोठी भांडवली गुंतवणूक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून मोठी मोठी कर्ज घेतलेली आहेत. ही सर्व कर्जे एनपीए मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून लाखो लोकांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम देणाऱ्या व शेकडो व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी निर्माण करून देणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई पोटी भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची राज्याच्या रोजगार निर्मिती प्रक्रियेमध्ये व एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका असते.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी प्रोत्साहन पर अनुदानाची तरतूद करावी तसेच त्याच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे.सलग तीन वर्षे भांडवली गुंतवणूक करून द्राक्ष उत्पादक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत गेलेले दिसत आहेत. काही शेतकऱ्यांवर त्यांची जमीन विकण्याची वेळ आली आहे.यातून आता सोलापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्राला सुरुवात झालेली दिसत आहे. तरी शासनाने युद्धपातळीवर पिक नुकसानीचे पंचनामे करून करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केली. सदरच्या अवकाळी पावसामुळे डाळिंब, कलिंगड,टरबूज, कांदा,दोडका,हरभरागहू पालेभाज्या, फळभाज्या या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून शासनाने नुकसान-सर्वेक्षणाचे आदेश पारित करून सरसकट सर्व बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी प्रा. संग्राम चव्हाण यांनी केली.
कीटकनाशके बुरशीनाशके तसेच विद्राव्य खते यांच्या किमती अडीच पट वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यांच्या वापराशिवाय शेती होऊच शकत नाही. सदर कंपन्या शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करत असून दरवाढ व कर वाढ यावर शासनाचे नियंत्रण असायला हवे.त्यामुळे कीटकनाशके बुरशीनाशके व खतांच्या किमती शेतकऱ्यांच्या अवाक्या बाहेर गेलेल्या आहेत.ही उत्पादने माफक दरात उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सदर उत्पादनावरील जीएसटी कर माफ करणे ही काळाची गरज असून त्याबाबत राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण त्वरीत राबविले पाहिजे या महत्त्वाच्या बाबीकडे ही प्रा.संग्राम चव्हाण यांनी लक्ष वेधून घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here