शेजबाभूळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या 7 बालसंशोधकांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेजबाभूळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या 7 बालसंशोधकांचा सत्कार

आज ग्रामपंचायत शेजबाभूळगावच्या वतीने डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम इग्नाईट माईंड अवार्ड साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या 7 बालसंशोधकांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी श्री सिद्धेश्वर निंबर्गी साहेब, माजी सरपंच श्री नागराज पाटील, उपसरपंच श्री माधवराव पाटील, केंद्रप्रमुख श्री तिपन्ना कमळे साहेब,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम. काटोटे मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब फडतरे व ग्रा.सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
आकाश मधुकर फडतरे, वेदांतराज चंद्रकांत नवले,सम्राट अशोक रणदिवे, गणेश दादा भोई, सुमीत समाधान शिंदे, हर्षवर्धन विनायक इंगळे, पृथ्वीराज शिवाजी लाळे या बालसंशोधकांसह मार्गदर्शक पैगंबर तांबोळी सर व मुख्याध्यापक श्री बाबासाहेब शिंदे सर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगीराज इंगळे सर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य श्री प्रदीप फडतरे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ. स्वाती दिपक गवळी, ग्रामसेवक श्री विलास माने भाऊसाहेब,सर्व सदस्य व श्री रामचंद्र कांबळे यांनी केले.
कार्यक्रमास सकाळचे प्रतिनिधी श्री रमेश दास सर,इनोव्हेटिव्ह स्कूलचे मुख्याध्यापक श्री रियाज तांबोळी सर,श्री.सागर येळवे सर,श्री चंद्रकांत नवले सर,श्री नेताजी रणदिवे सर तसेच श्री मोकाशी सर,श्री विजयकुमार घोंगडे,श्री काकासाहेब फडतरे , पालक,शिक्षक व सर्व अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विज्ञानग्राममुळे संशोधनाची संधी मिळाली.विज्ञानग्रामचे वैज्ञानिक श्री अरुण देशपांडे सर व सुमंगला देशपांडे मॅडम यांनी मुलांचे कौतुक केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here