शिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. च्या पाठपुराव्याला यश

 

कोव्हिडं च्या या असामान्य परिस्थितीमध्ये व आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही आहे ही गंभीर बाब लक्षात घेता केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. ने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार केला असता का १७ जून २०२१ रोजी शिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
कोरोनामुळं वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्या मुलीच्या आईला शालेय शुल्क भरण्यास अडथळा येत होता त्यामुळे पहिल्या खाजगी शाळेतून काढून पालिकेच्या शाळेत दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पालिकेच्या शाळेनं अगोदरच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही तर पुढील शिक्षणासाठी अडथळा निर्माण होणार असल्याचं सांगितलं. या संबंधित माहिती केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. ला मिळताच सी.पी.जे.ए. चे सोशल मीडिया सेल चे मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्या सचिव शिवाजी खैरनार यांनी केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दिनांक १४ जून २०२१ रोजी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असता वर्षा गायकवाड यांनी दिनांक १७ जून २०२१ रोजी सदर बाब गांभीर्याने घेऊन शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला प्रवेश मिळालाच पाहिजे असा नियम लागू करत गरजू विद्यार्थ्यांचा दुसऱ्या शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
दरम्यान वर्षा गायकवाड यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्याचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानावे.
इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात प्रवेशाची मागणी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नाही म्हणून प्रवेश नाकारू नये. त्यांना तात्पुरता प्रवेश देऊन माध्यमिक शाळा संहिता मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी असे आदेशही शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.  विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक व शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा ही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
दरम्यान यशस्वीरीत्या झालेल्या या पत्रव्यवहारामुळं केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. च्या संपूर्ण टीम चे ज्येष्ठ समाजसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here