शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन

सोलापूर /5 प्रतिनिधी 

जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर (बैलपोळा/कर) सणानिमित्त वन्यजीवांची शिकार करण्याची प्रथा आहे. वन्यप्राण्यांची शिकार करणे गुन्हा असून ससे, हरिण आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला द्यावी किंवा 1926 टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
वन्यजीवांची तस्करी, शिकार आणि विक्री थांबविण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अन्वये कायदा केला आहे. कायद्यनुसार शिकार करता येत नसताना काही गावामध्ये वन्य प्राण्यांची अवैध शिकार करीत आहेत. आपल्या गावात, परिसरात वन्य प्राण्यांची कोणी शिकार करीत असताना आढळून आल्यास स्थानिक वन विभागाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here