शासकीय कार्यालयातील कर्मचारी शंभर टक्के संपावर गेल्याने कामकाज ठप्प संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शासकीय कार्यालयातील कर्मचारी शंभर टक्के संपावर गेल्याने कामकाज ठप्प

संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट!

मंगळवेढा येथील प्रांत कार्यालय,तहसिल कार्यालय,पंचायत समिती,तालुका कृषी कार्यालय आदी कार्यालयातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 100% संपावर गेल्याने दिवसभरासाठी कामकाज ठप्प झाल्याने तालुक्यातील कानाकोपर्‍यातून कामासाठी आलेल्या नागरिकांना कार्यालय कामकाज बंद स्थितीत असल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे चित्र होते.

राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्यातील कर्मचारी संघटनेने गुरुवार दि.14 रोजी संपाचा यल्गार पुकारला होता. त्या प्रमाणे प्रांत कार्यालय,तहसिल कार्यालय,पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभाग,पशुसंवर्धन विभाग,पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमिअभिलेख कार्यालय,तालुका कृषी कार्यालय आदी कार्यालयामधून जवळपास 100% कर्मचारी संपावर तर अधिकारी सामुदायिक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील 17 लाख कर्मचार्‍यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अधिवेशन सुरु असताना सरकारला दिला होता. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होवूनही तोडगा न निघाल्याने गुरुवारी सर्व कर्मचारी संपावर गेले. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना या संपाची पुसटही कल्पना नसल्यामुळे अनेक नागरिक काम घेवून तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विविध शासकीय कार्यालयात दिवसभर येत असल्याचे चित्र होते. नेहमी वर्दळीची असणारी शासकीय कार्यालयात संपामुळे शुकशुकाट दिसून येत होता. अनेक विभाग कुलूपबंद असल्याचेही येणार्‍या नागरिकांच्या निदर्शनास येत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here