शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले.

सोलापूर // प्रतिनिधी 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बंगळुरू येथे भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

या भेटीबद्दल शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, बंगळुरुमध्ये गेलो असता मला कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बोम्मई यांचा फोन आला. त्यांनी माझ्याशी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पदाचा मान राखत मी त्यांना भेट घेण्यासाठी गेलो. त्यांच्या पाहुणचाराबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. इथून पुढे महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये येत्या काही वर्षांमध्ये सहकारी दृष्टीने एकत्र काम करत राहतील अशी आशा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे

त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाणीवाटपाबद्दल तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुराच्या प्रकरणांमध्ये परस्पर सहकार्याबद्दल बोलले. त्यांनी दोन्ही राज्यांमध्ये (कर्नाटक आणि महाराष्ट्र) आंतरराज्यीय पाणी समस्या आणि नदीच्या पाणीवाटपावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे ठरवले. त्यांनी दिल्लीत या विषयावर चर्चा करण्याचे ठरवले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here