शरद पवार-देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंचावर; एकमेकांविषयी काय बोलणार? रविवारी दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे सांगोल्यात अनावरण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. सोबतच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि फडणवीस पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहेत.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे येत्या रविवारी (ता. १३ रोजी) अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सांगोल्यात एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचा एक गट फुटल्यानंतर आणि पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार फडणवीस हे दोन नेते प्रथमच पुन्हा एकत्रित येणार आहेत.

या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना दोन्ही नेते एकमेकांविषयी काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण करण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here