शब्दाला पक्का असणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राजाभाऊ खरे:लखनभाऊ वाघमारे मोहोळ मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील चळे गावात राजाभाऊ खरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार:लखन भाऊ वाघमारे चळे गावातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भाऊंचा आमच्या गावाला सिंहाचा वाटा:लखन भाऊ वाघमारे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शब्दाला पक्का असणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राजाभाऊ खरे:लखनभाऊ वाघमारे

मोहोळ मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील चळे गावात राजाभाऊ खरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार:लखन भाऊ वाघमारे

चळे गावातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भाऊंचा आमच्या गावाला सिंहाचा वाटा:लखन भाऊ वाघमारे

247 मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांनी मागील जवळ एक वर्षाच्या पुढील कालावधीपासून संपूर्ण मोहोळ मतदार संघ पिंजुन काढला आहे. मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी मागेल विज याप्रमाणे त्यांनी संपूर्ण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे कर्तबगारीचे काम केले असून त्यांनी मोहोळ मतदार संघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये विशेषतः चळे गावामध्ये सुभेदार चौक ते भीम नगर रस्ता कॉंक्रेटीकरणासाठी १० लाख रूपये निधी दिला आहे. मूलभूत प्रश्न सोडवण्याची किमया उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी केली असून त्यांनी पंढरपूर तालुक्यातील त्या १७ गावांमध्ये, रस्ता ,वीज, पाणी तसेच समाज मंदिरासाठी मोठा निधी आणला आहे.

उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ तृप्ती ताई खरे यांनीही हळदी कुंकाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये भेटीगाठींचा कार्यक्रम सुरू केला असून त्यांनीही महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

एकीकडे या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये प्रस्थापित, नेते मंडळींनी येथील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलेले असताना कोणत्याही शासकीय पदावर नसताना अथवा कोणतेही मोठी जबाबदार नसताना फक्त आणि फक्त समाजाची आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी या भागातील विशेष:ता पंढरपूर तालुक्यातील मतदार संघातील असणाऱ्या गावांमध्ये मोठी मदत स्वखर्चातून केली आहे. यावेळी लखन भाऊ वाघमारे यांच्या सोबत चळे गावातील दादा फरतडे, रुपेश वाघ, भैया शिखरे, बापू शिखरे, गणेश सोनटक्के, सुशील वाघमारे, धनाजी माने, तानाजी वाघमारे, ज्ञानेश्वर शिखरे, कांता शिखरे, माऊली शिखरे, नागनाथ शिखरे, पंढरी शिखरे धनाजी वाघमोडे आधी सर्व तरुण युवक कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========

चौकोट

यावेळी या मतदारसंघातील व विशेषता: चळे गावातील राजाभाऊ खरे यांचे समर्थ लखनभाऊ वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीची संवाद साधताना सांगितले की;
आम्ही सगळे गावातून उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्यासाठी मोठी ताकद उभी करणार असून या माध्यमातून त्यांना आगामी मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवून देऊन त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here