वीर जवानांचे गाव: सैनिक टाकळी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वीर जवानांचे गाव: सैनिक टाकळी

 

कृष्णेच्याकवेतील सैनिक टाकळीमधल्या शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगिलयुद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. गावच्या चारही रस्त्यांना जाग येते तीतरुणांच्या रपेटीनं. सैनिक टाकळी येथील पाच-पाचपिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठीबलिदान दिलेले आहे. म्हणूनच हे गाव ‘सैनिक टाकळी’ म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. आज भारतातील असे एकही लष्करी तळनाही की, जिथे या गावातील जवानाने सेवाबजावलेली नाही. सैनिक टाकळीत सामुदायिक भवनाच्या शेजारी ‘अमर जवान’ स्मारक असून; या स्मारकावर युद्धात कामी आलेल्या १८ जवानांची नावे कोरली आहेत.
            स्वातंत्र्यासाठी अनेकांनी दिलेले बलिदान, संघर्ष आणि लढा आपण कधीही विसरून चालणार नाही.आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. यामध्ये अनेकसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. सैनिक टाकळीलादेखील पाच पिढ्यांपासूनदेशसेवेची परंपरा आहे. हीच परंपरा जोपासण्याचे काम येथील तरुणामध्ये सातत्यानेदिसून येत आहे. यंदाचेवर्ष भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष असून भारताच्यास्वातंत्र्यासाठी ज्ञात-अज्ञात लाखो वीरांनी जीवाची आहुती देवून आपणास स्वातंत्र्य दिले आहे. या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अजूनही अनेक कुटुंबेआपल्या घरातील एकतरी सदस्याला भारतीय लष्करात दाखल करण्याची परंपरा शाबूत ठेवूनआहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी हे गाव असूनज्याची ओळख संपूर्ण देशाला आहे; ते म्हणजे ‘सैनिक टाकळी’….!      
            विस्तीर्ण कृष्णेने तिन्ही बाजूंनी कवेत घेतलेले हेगाव. दरवर्षीच्या पुराने या गावची माती सुपीक होत राहते, तशीच येथील माणसाची मनेही सुपीक होतात. मन आणि मेंदूहीबळकट. विशाल हृदयाच्या येथील अनेक शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्याकारगील युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. गावच्या चारही रस्त्यांना जाग येतेती तरुणांच्या रपेटीनं. पाच-पाचपिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे. म्हणूनच या गावाला ‘सैनिक टाकळी’ या नावाने संपूर्ण भारतात ओळखले जाते. ही लोक-बिरूदावली गाव केवळअभिमानाने मिरवते असे नाही तर त्या बिरुदावलीला आजही जागत राहिले आहे.
            निवृत्तझालेले असले तरी ये‌थील जिंदादिल जवानांमध्ये देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. महाराष्ट्रातीलकोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर शिरोळ तालुक्यातील ‘सैनिक टाकळी’ या गावाला पाच पिढ्यांपासून सैनिकी परंपरेचा वारसा आणि इतिहास लाभला आहे. सहाहजार लोकसंख्या असलेल्या यागावातील जवळपास प्रत्येक परिवाराने एक तरी सैनिक देशाला सुपूर्त केला आहे.
            कोल्हापूरजिल्हा संपन्न. त्यातला शिरोळ तालुकाही सुपीक. ऊस, केळी, कसदार फळभाज्या आणि भाजीपाला पिकविणारा हा तालुका.कर्नाटकराज्याच्या सीमेवर वसलेलं सैनिकटाकळी. गावची लोकसंख्या सहा हजार आहे. जवळपास सोळाशे एकर मुबलक जमीन या गावातआहे. पैकी अकराशे एकर बागायत जमीनआहे. गावात जवळपास सातशे माजी सैनिक असून महिन्याला कोटीची उलाढाल होते. एवढे आर्थिक स्थैर्यअसतानाही येथील तरूण सैन्यात भरती होण्यासाठी आसुसलेला असतो. गावातील निवृत्त जवानही येथील तरुणांची खरी प्रेरणा आहे.
            गावातलीसैनिकी परंपरा सुरू झाली ती पहिल्या महायुद्धापासून. त्या काळात गावोगावी देशी, मर्दानी खेळ खेळले जात. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टाअशी सर्वांगानं मेहनत होणार्‍या खेळाने अंगात रग असायची. सैनिक टाकळीतही लाठीकाठी, लेझीम, दांडपट्टाखेळून घाम गाळणारे, पीळदार बाहूंचे तरुण रोज सराव करीत. पहिल्यामहायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गावोगावचे असे तगडे जवान सैन्यात भरतीकरण्यात आले. त्यात सैनिक टाकळीतील ६० जवान हेरून त्यांना सैन्यात भरती केले.त्यासाठी तत्कालीन सरकारने जमिनीही दिल्या. आजही या जमिनी ‘लष्करी पट्टा’ म्हणूनओळखल्या जातात.
            युद्धसमाप्तीनंतरकाहीजण सहा वर्षे पायपीट करत निव्वळ ग्रह, तार्‍यांच्यासोबतीने दिशेचा अंदाज घेत गावी परतले. एवढ्या वर्षांत आपल्या माणसाचा थांगपत्तालागला नाही म्हणून काही कुटुंबीयांनी त्यांचे पिंडदानही केले. ‌मात्र काही जिगरबाजमहिलांनी पतीचे प्रेत पाहिल्याशिवाय कुंकू पुसणार नाही, अशी शपथ घेतली ती शेवटपर्यंत पाळली. ज्याच्या नावानेपिंडदान केले तो माणूसही काही वर्षांनी परतला. मेलेल्या माणसाबद्दल अनेक दंतकथाप्रसवत राहतात. या गावाने मात्र त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या. दुसर्‍या महायुद्धातलढताना हवालदार तुकाराम केशव पाटील यांचे शीर धडापासून वेगळे झालेले. तरीही शीरनसलेलं हे धड दीर्घकाळ गोळीबार करीत राहिलं. शत्रूच्या काळजात धडकी भरविणारा हाप्रसंग होता.
            ब्रिटिशसरकारने हवालदार तुकाराम केशव पाटील यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचा मरणोत्तरपुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांच्या मातोश्रींना त्यावेळी रोख सात हजारांचे बक्षीसआणि पेन्शनही सुरू केली. ‘युद्ध्स्य कथा रम्यः’ असे म्हटले जाते. मात्रयुद्धभूमीवरील समरप्रसंगात साक्षात् मृत्यु समोर असतानाही त्याला भिडायचे कसे, याचा वस्तुपाठच येथील नव्या पिढीला आजी-माजी सैनिकांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि अनुभवातून मिळत गेला.
            ज्येष्ठस्वातंत्र्यसेनानी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पंचगंगा साखर कारखान्यासाठीउभारलेल्या इरिगेशन स्किमच्या उद्घाटनासाठी १९६८ मध्ये जनरल पी. पी. कुमारमंगलम् आले होते. तेव्हाकुमारमंगलम यांच्या टाकळी भेटीचे नियोजनही केले होते. त्यांच्या स्वागतासाठी ‌सर्वनिवृत्त जवान लष्करी गणवेषात उपस्थित होते. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले जवानपाहून, “इतके निवृत्त जवानकुठून आले?’ असे त्यांनी विचारले. तेव्हा ते सर्वजण याच गावचे असल्याचे सांगितल्यानंतर कुमारमंगलम् यांनीकौतुकाने “अरे, ये टाकळीनहीं, ये तो सैनिक टाकळी हैं!” असे गौरवोद्गार काढले. त्या दिवसापासून गावाला ‘सैनिक टाकळी’ या नावाने ओळखले जाऊलागले. कागदोपत्री आणि सरकार दरबारी जी प्रक्रिया होणे आवश्यक आहे, तीहोत राहील. मात्र, आतालोकांनीच ‘सैनिक टाकळी’ हे नाव वापरण्याससुरूवात केली आहे. जनरल पी. पी. कुमारमंगलम् यांनी१९६८ मध्ये अर्थात ५३ वर्षांपूर्वी ‘टाकळी’ या गावाला ‘सैनिकटाकळी’ हेनाव दिलेले आहे. यामुळे हे नाव वापरण्यासाठी आणखी कुणाच्या परवानगीची गरज नाही. जनताहेच नाव वापरत आहे.    
केवळ हजार-दीड हजारकुटुंबे असलेल्या या गावाने देशाला दीड हजाराहून अधिक सैनिक दिले आहेत. इसविसन १९१४ ते २०२१ अशी१०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंबमहाराष्ट्रातील वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच ‘महाराष्ट्र बुक ऑफरेकॉर्डस्’ च्या वतीने यथोचित गौरवकरण्यात आला. सैनिक टाकळी येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्यामहायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते तत्तपश्चात याकुटुंबाला ‘सुभेदार’याटोपन नावाने ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेवरावसाहेब जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते.त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन इंग्रजांच्यानोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. यांचाहीपुतण्या ऑ. कॅप्टन बापूराव जाधव यांनी इसविसन १९६५व इसविसन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनीगावातील आजी-माजी सैनिकांना एकत्र करून ‘माजीसैनिक कल्याण मंडळ’चीस्थापना केली. पहिले आणिदुसरे महायुद्ध, स्वातंत्र्योत्तर काळात चीन, पाकिस्तानविरोधात झालेली युद्धे आणि श्रीलंकेतपाठविलेल्या शांतीसेनेच्या ‘लिट्टे’शी झालेल्या संघर्षात आणि आजपर्यंतझालेल्या वेगवेगळ्या युद्धात शहीद झालेल्या सैनिक टाकळी गावच्या १८ जवानांचे प्रेरणादायी ‘अमर जवान’ स्मारकयेथे उभारण्यात आले आहे.
इसविसन२००७ सालीसैनिक समाज कल्याण मंडळाने या स्मारकाची स्थापना केली. गावातील वीर माता, वीरपत्नी व आजी-माजी सैनिकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या. त्यांचा मुलगा भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये नाईकपदावर होता. त्यांनी इसविसन १९८४ पासून इसविसन २००१ पर्यंत देशसेवाकेली. सध्या सुभेदार कुटुंबातील पाचव्यापिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हाही इसविसन २०१६ पासून सिपाई या पदावर भरती झालाआहे.
इसविसन१९१४ पासून इसविसन २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील एकअत्यंत उल्लेखनीय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबाचेप्रतिधिनी म्हणून नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांना ‘महाराष्ट्रबुक ऑफ रेकॉर्डस्’ चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी शाल,श्रीफळ,मेडल, स्मृतीचिन्हव प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले आहे.
महाराष्ट्रातीलसैनिक टाकळी हेगाव पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सशस्त्र सैन्यदलात सैनिक पाठवीत आहे. सैनिक टाकळीचीही ‘सैनिकी परंपरा’ मनोहर महादेव भोसले यातरुणाने सचित्र पुस्तक रुपाने संकलित केली असून ती सचित्र माहिती कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूरयांच्या माध्यमातून ‘सैनिकी परंपरेचेगाव – सैनिक टाकळी’ याशीर्षकाने ग्रंथरूपाने दोन भागात प्रकाशित झाली आहे. सैनिक टाकळी गाव वसले कसे याचा मागोवाही घेतानात्याला टाकळीचे मूळ लखोजी जाधवांच्या घराण्यापर्यंत असल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. हा शोध घेताना हेळव्यांच्यादप्तराचासुद्धा आधार घेतला गेला आहे.
– डॉ. सुनील दादा पाटील, संपादक: महाराष्ट्रबुक ऑफ रेकॉर्डस्

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here