विश्वाचा अन्नदाता असलेल्या शेतक-याला समाधानी ठेवा -ह भ प गोपाळआण्णा वासकर महाराज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संपुर्ण विश्वाचा अन्नदाता असलेल्या शेतक-यांना समाधानी ठेवा, त्यांच्या घामाच्या पिकाला चांगला दाम द्या  परमेश्वराचे कृपेने तुमचे कारखान्याचे गळीतास ऊस कमी पडणार नाही असे भावनीक आवाहन श्री संत दामाजी सह साखर कारखान्याचे ३०व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना ह भ प गोपाळआण्णा वासकर महाराज यांनी केले        
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ साठीचा ३० वा गळीत हंगाम शुभारंभ सोमवार दिनांक १७/१०/२०२२ रोजी सकाळी ११ ३० वाजताचे शुभमुहAतावर ह भ प  गोपाळआण्णा तुकाराम वासकर महाराज तसेच जेष्ठ सभासद शेतकरी श्री रमेश किसनलाल मAदा, श्री मनोहर गंगाराम कलुबAमे, श्री जगन्नाथ बिराप्पा कोकरे, श्री दादा धोंडीबा बंडगर, श्री भिमराव शंकर मोरे, श्री कृष्णदेव केराप्पा मासाळ  यांचे शुभहस्ते  संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा  श्री शिवाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला   या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन ॲड  श्री नंदकुमार पवार, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री रामकृष्ण नागणे, कारखान्याचे माजी व्हा चेअरमन श्री रामचंद्र वाकडे, माजी संचालक श्री यादाप्पा माळी उपस्थित होते   गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक श्री गोपाळ दगडू भगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ  रिना गोपाळ भगरे या उभयतांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूज करण्यात  आली  
ह भ प  गोपाळआण्णा वासकर मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतकरी हा केंद्रबिंदू असला पाहिजे  पाणी जसे सAवामध्ये समरस होते तसे शेतकरीही सAवांशी समरस होत असतो   शेतकरी हा निसAगाशी, बाजारभावाशी, कारखान्याशी समरस होत असतो   दुख सहन करण्याची क्षमता फक्त शेतक-यांमध्येच  आहे   शेतकरी हा मालाच्या भावाविषयी कधी तक्रार करीत नाही, जो भाव मिळेल तो स्विकारतो  शेतकरी हा आपला अन्नदाता आहे   सारासार विचार करुन मुलभूत गरजा ओळखता आल्या पाहिजेत  जमीन ही त्याची लक्ष्मी आहे   ती भूमी देईल त्यात समाधान मानणारा शेतकरी आहे  त्यामुळे कारखानदारांनी शेतक-यांना समाधानकारक भाव दिला तर शेतकरी समाधानी रहाणार आहे
  कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी आपल्या प्रास्तावीकमध्ये ते म्हणाले, कारखान्याचे संचालक मंडळाने सहा लाख मे टन ऊस गाळपाचे उद्षि्ट ठेवलेले आहे  कमी वेळेत कामगारांनी आॅफ सिझनमधील कामे पूर्ण करुन सहकार्य केल्याने कामगार अभिनंदनास पात्र आहेत  दामाजी कारखान्याच्या ऊस वजन काट्याबाबत शेतक-यांमध्ये विश्वास असल्याचे त्यांनी सांगीतले  
कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील मनोगतामध्ये म्हणाले, तालुक्यातील जेष्ठ मंडळींनी आणि सभासद-शेतक-यांनी कारखान्याची जबाबदारी आमचेवर दिली आहे   मागील संचालक मंडळाने केलेली देणी फेडण्याचे काम आमच्या संचालक मंडळावर आले आहे  श्री प्रशांतराव परिचारक, श्री भगिरथ भालके यांचे मार्गदर्शन, कारखान्याचे व धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा शिवाजीराव काळुंगे, श्री रामकृष्ण नागणे, श्री राहूल शहा, श्री दामोदर देशमुख यांनी बँकेच्या माध्यमातून आAथिक सहकार्य केल्याने आपण हा गळीत हंगाम चालू करु शकलो आहे   प्रति दिवस साडेचार ते पांच हजार मे टन गाळप होईल अशा प्रकारे नियोजन करुन यंत्रणा भरलेली आहे  या संचालक मंडळाने स्वताच्या मालमत्तेवर कAजे काढून निधी उपलब्ध केला आहे   शेतक-यांची मागील संचालक मंडळाचे काळातील रु  २१००/- प्रमाणे राहिलेली बिले अदा केली आहेत  एफ आर पी  पूर्ण करण्यासाठी राहिलेले रु  १११/- बिल दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकÅयांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग करणार आहोत  सभासद-शेतकरी व कामगार हे संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे घटक आहेत  दिवाळीसाठी कामगारांची बोनसची रास्त मागणी आहे  परंतु आAथिक अडचण असतानासुध्द्ा कामगारांचे योगदान विचारात घेवुन  कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दहा दिवसाच्या पगाराएवढा बोनस देण्यात येणार असलेचे त्यांनी सांगीतले   कारखान्यात डिस्टीलरी प्रकल्प प्रस्तावित असुन याबाबत कारखाना कार्यस्थळावर १८/१०/२०२२ पAयावरणविषयक जाहिर सुनावणी आहे   लवकरच हा प्रकल्प माAगी लावण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे   कारखानदारीच्या स्पAधेमध्ये दामाजी कारखाना निश्चीतच सAवांच्या बरोबरीने राहील याची मी ग्वाही देतो  यासाठी सभासद-शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी  केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव काळुंगे मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पAधेत टिकुन राहणेसाठी कारखान्याला डिस्टीलरी व इथेनाॅलशिवाय पAयाय उरलेला नाही   त्यामुळे या संचालक मंडळाने यासाठी तत्परतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे  सध्याची कारखान्याची आAथिक परिस्थिती पहाता या संचालक मंडळाने काटकसरीने कारभार केला पाहिजे  शेतक-यांनीही चांगल्या प्रतिचा ऊस गळीतासाठी दिला तर रिकव्हरी चांगली मिळून त्याचा फायदा संस्थेबरोबरच शेतक-यांनाही होणार आहे  चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी शेत्ाकरी व कामगार यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे  अल्पावधीतच या संचालक मंडळाने निधी उभारुन शेतक-यांची बिले,तोडणी वाहतुक ॲडव्हान्स, मशिनरी दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियल खरेदी केले असुन कामगारांचे पगारही दिले आहेत  हा कारखाना चांगला चालविणेची नैतिक जबाबदारी संचालक मंडळाबरोबरच सभासद-शेतक-यांचीही आहे   सर्व संकटांवर मात करुन संचालक मंडळास काम करावे लागणार आहेत  अडचणी जरी असल्या तरी यातून मार्ग काढून शेतक-यांचे भले कसे होईल हे पाहिले पाहिजे   शेतक-यांनी ऊस गळीतास नेण्यासाठी घाई न करता ऊस परिपक्व झाल्यानंतरच गळीतासाठी दिला पाहिजे   यामुळे रिकव्हरी वाढून त्याचा फायदा होणार असलेचे ते म्हणाले    
रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा म्हणाले, जेष्ठ मंडळींनी धाडस दाखवून अडचणीत असलेल्या संस्थेस आAथिक हातभार लावला आहे   कारखाना वेळेत सुरु करणेसाठी  तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी या जेष्ठ मंडळीनी आAथिक मदत केली आहे   शेतक-यांनीही नवीन सभासदत्व स्विकारुन कारखान्यास मदत केलेली आहे   चालू सिझनमधे कारखाना निश्चीतच गाळपाचे उदिष्ठ पार पाडेल अशी आशा शेवटी त्यांनी व्यक्त केली  
याप्रसंगी कारखान्याचे माजी संचालक श्री मनोहर कलुबAमे यांनी कारखाना उभारणी काळातील जुन्या  आठवणींना उजाळा दिला   तसेच याप्रसंगी श्री लतिफ तांबोळी, किशोर मAदा, देवानंद गुंड-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमासाठी व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, माजी संचालक श्री प्रकाश गायकवाड, नियोजन मंडळ सदस्य श्री अजित जगताप,  माजी संचालक श्री जालिंदर व्हनुटगी, श्री भारत पाटील, नगरसेवक प्रशांत यादव, चंद्रशेखर कोंडूभैरी, अरुण किल्लेदार, यांचेसह मुझफर काझी, नंदकुमार हावनाळे, दादा पवार, काशिनाथ पाटील, रामभाऊ सलगर, वसंत घोडके,नितीन पाटील, मुरलीधर सरकळे, महावीर ठेंगील, दौलत माने, विठठल आसबे, ह भ प ज्ञानेश्वर भगरे, कल्याण रोकडे, माणीक पवार, अशोक पवार, सिध्दे्श्वर कोकरे, उत्तम घोडके,  संचालक श्री प्रकाश पाटील,  औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,  विविध गावचे सरपंच, पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते
         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले तर संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here