विश्वक्रांती मालवाहतूक संघटनेच्या रक्तदान शिबिरात मनसेतर्फे वाहन चालकांना विमा कवच

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विश्वक्रांती मालवाहतूक संघटनेच्या रक्तदान शिबिरात मनसेतर्फे वाहन चालकांना विमा कवच

सोलापूर // प्रतिनिधी

विश्वक्रांती मालवाहतूक संघटना पंढरपूरच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मनसेच्या वतीने पंढरपूर शहरातील 180 मालवाहतूक गाड्यांच्या मालक ड्रायवर यांचा प्रत्येकी दोन लाख रूपये किमतीचा विमा देण्यात आले.

यावेळी नगरसेवक गणेश आधटराव, नगरसेवक लखन चौगुले, दिलीप साबळे, संस्थेचे अध्यक्ष नागेश इंगोले उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या काळात रूग्णांना मदत केल्याबद्दल मालवाहतूक, रिक्षा ड्रायवर याचा झाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात वाहन चालकांना मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापु धोत्रे यांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here