विद्यार्थ्यानी संशोधनात्मक वृत्ती विकसित करावी : डॉ. विवेक जोशी. कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये श्रद्धेय सुधकरपंत परिचारक यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबर च विद्यार्थ्यानी संशोधांनात्मक वृत्ती विकसित करून त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व देशाच्या संरक्षणासाठी करून भारताला स्वयंपूर्ण व शक्तीशाली राष्ट्र बनवावे असे मत संरक्षण संशोधन विकास संस्था, पुणे (DRDO) चे अधिकारी डॉ. विवेक जोशी यांनी केले. कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे मध्ये श्रद्धेय श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिना निम्मीत्त आयोजित केलेल्या व्याख्यानामद्धे “स्वराज्य ७५ उद्योजकता व तंत्रज्ञान” या विषयावर” ते बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी मोठ्या मालकांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना त्यांनी महाविद्यालय व कर्मयोगी पॅटर्न याबाबत सखोल माहिती देऊन महाविद्यालयाच्या यशाचा चढता आलेख सादर केला. प्रा. संदीप सावेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी. कणसे यांच्या हस्ते डॉक्टर जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
व्याख्यानामद्धे डॉ. जोशी यांनी भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि विचारधारा, स्वदेशीचा स्वीकार, भारतीय संस्कृती, धातुशात्र, रसविद्या, नौकाशास्त्र, कालगणना अश्या विविध विषयावर प्रकाशझोत टाकला.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी मोठ्या मालकांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here