विणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी

 

पंढरपूर : आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. यंदाची आषाढी वारी मंगळवार दि. २० जुलै रोजी साजरी होणार आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना मुख्यमंत्र्यां सोबत महापूजेची संधी दिली जाते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.
त्यामुळे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्रीच्या हस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणा-या एकूण ८ विणेक-यांपैकी २ विणेक-यांना मागी वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती. तसेच ४ विणेक-यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेक-यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत. स्वत: व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह.भ.प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here