विडी कामगारांनी वृक्षारोपणाने साजरा केला शिवसेना वर्धापन दिन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विडी कामगारांनी वृक्षारोपणाने साजरा केला शिवसेना वर्धापन दिन

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत विडी कामगार बंधु – भगिनींनी वृक्षारोपण व वृक्षसंरक्षण करण्याचे शपथ घेऊन वर्धापन दिन जल्लोषाने साजरा केला.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राज्याचे पर्यटनमंत्री व पर्यावरणमंत्री मा.ना.श्री .आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसापासुन शिवसेना वर्धापन दिनापर्यंत म्हणजे १३ जुन ते १९ जुन असे ७ दिवस वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आले . या सप्ताहात कामगार सेना कार्यालय सोलापूर शहर, कुंभारी माँ साहेब विडी घरकुल तसेच विविध सार्वसनिक ठिकाणी सुमारे ८३० वृक्षांची लागवड करून हे ८३० वृक्ष संवर्धन करण्याचे जबाबदारी प्रत्येकाला देऊन शपथ ग्रहण करण्यात आले.
आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत सकाळी ११ वाजता वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले . प्रारंभी स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यांनतर उपस्थित महिला विडी कामगार व बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले . त्यावेळी सर्व महिला विडी कामगारांनी दिलेले वृक्ष पुढच्या वर्षापर्यंत सावली देतील असे संरक्षण करू असे म्हणाले.
सदर वर्धापन दिन कार्यक्रमात विष्णु कारमपुरी (महाराज), दशरथ नंदाल, श्रीनिवास चिलवेरी, विठ्ठल कुऱ्हाडकर , श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का , गणेश म्हंता , जगदेवी सरवदे , रेखा आडकी , लक्ष्मी बंदगी , अनिता बटगिरी , लक्ष्मीबाई चिटमिल , शारदा कामुर्ती , मिराबाई गुर्रम , उमेश कोंपी , सोमनाथ मादगुंडी , श्रीगिरी सावजी , श्रीनिवास श्रीमल , नरेश अन्नलदास , लक्ष्मण रापेल्ली , सिद्राम चिलवेरी , पणु शेख , रमेश चिलवेरी , संजीव शेट्टी, बालाजी भंडारी यांच्यासह कामगार बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here