धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस भवनात घेतला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार!
सोलापूर // प्रतिनिधी
काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या त्यांचे आजोबा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील दोन्ही मुलं उपस्थित होती, जिल्हा परिषदेतून वाजत गाजत हलग्यांच्या कडकडाट, तुतारीसह धवलसिंह काँग्रेस भवनात दाखल झाले, याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आणि जंगी स्वागत केले.