विडी कामगारांचे रोजगार बंद होऊ नये यासाठी शासनामार्फत उच्च न्यायालयात सकारात्मक बाजु मांडावे.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विडी कामगारांचे रोजगार बंद होऊ नये यासाठी शासनामार्फत उच्च न्यायालयात सकारात्मक बाजु मांडावे.

कॉंग्रेस विडी व यंत्रमाग सेलच्या वतीने मा. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील सत्तर हजार व महाराष्ट्रातील चार लाख विडी कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वीस लाख कुटुंबीयांचा रोजी रोटीचा विचार करून विडी कामगारांचे रोजगार बंद होऊ नये यासाठी उच्च न्यायालयात शासनामार्फत सकारात्मपणे बाजू मांडावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे व कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले व सोलापूर शहर कॉंग्रेस विडी व यंत्रमाग सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, सत्यम्मा बोल्ली, सुनीता पासकंटी, विमलाबाई दासरी, लक्ष्मीबाई नागुल, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष योगेश मार्गम, अशोक कलशेट्टी, माजी नगरसेवक जेम्स जंगम, परशुराम सतारेवाले, प्रसाद जगताप, प्रसाद मादास, कृष्णाहरी कोमाकुल, चंद्रकांत इंजामुरी, पांडुरंग चेरमण, व्यंकटेश नागुल, अजय आडम, नागेश गोन्याल यांच्यासह इतर उपस्थित होते.

सोलापूर शहर कॉंग्रेस विडी व यंत्रमाग सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, सोलापूर शहरातील सत्तर हजार व महाराष्ट्रातील जवळपास चार लाख महिला विडी काम करून आपली रोजीरोटी भागवितात. या विडी उद्योगात बहुसंख्य अशिक्षित, गरीब कुटुंबातील महिला विडी काम करून त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचा उपजीविका करतात. पण धूम्रपानामुळे कोरोना होतो म्हणून एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात विडी, सिगारेटवर तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालावी म्हणून याचिका दाखल केली आहे. आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व लॉकडाऊनमुळे देशातील कोट्यावधी नागरिक बेकार झाले असून याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागल्यास विडी उद्योग बंद करावे लागणार असून रोज काम केल्याशिवाय चूल पेटत नाही आणि हातावर पोट असलेल्या सोलापुरातील सत्तर हजार व महाराष्ट्रातील चार लाख विडी कामगार बेरोजगार होणार असून त्यांच्या व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या जवळपास वीस लाख कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी 24 जून ला असून त्यादिवशी शासनाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे आणि 25 जून ला न्यायालय याचिकेचा निकाल जाहीर करणार आहे. यात शासनाची बाजू निर्णायक राहणार आहे.
वास्तविक पाहता धूम्रपानामुळे कोरोना होत नसल्याचे अनेक तज्ञाचे मत आहे जागतिक आरोग्य संघटनेनेही असे कुठेही म्हटले नाही. पण एका संस्थेचा अहवालाच्या आधारे विडी सिगारेट वर बंदी तात्पुरत्या स्वरूपात घालण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या 24 जून ला शासनाच्या वतीने आपली बाजू मांडताना सोलापुरातील सत्तर हजार व महाराष्ट्रातील चार लाख विडी कामगारांचा व त्यावर अवलंबून असलेल्या वीस लाख कुटुंबीयांचा विचार करून विडी उद्योग सुरू रहावा म्हणून सकारात्मक बाजू भक्कमपणे मांडुन कामगारांची रोजगार वाचवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here