पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर, ता. पंढरपूर येथेसोमवार दि. २२.०५.२०२३ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० वाजणेचे दरम्यान अचानक वादळी वारे व अवकाळी पाऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे अतोनात नुकसान झालेले आहे. कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्किंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे.
सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपुर्ण पत्रे उडून जंबो झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजले- ले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झा लेले आहे. तसेच विठ्ठल प्रशा लेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्किंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे. कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गे- लेले आहेत. उडून झालेले आहे.
गेलेने नुकसान इंजिनिअरींग ऑफीस, शुगर हाऊस, टबाईन, बॉयलींग हाऊस इत्यादी वरील सिमेंटचे पत्रे उडून जावून फुटलेलेआहेत व शटर्स खराब झालेले आहेत. कारखान्याचे डिस्टीलरी विभागातील प्लॅन्टवरील सिमेंटचे पत्रे, पाण्याच्या टाक्या ऑफीसच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. बेणे मळा व साखर शाळा येथील पाण्याच्या प्लॅस्टीकच्या ५००० लिटर क्षमतेच्या दोन टाक्या वाऱ्यामुळे उडून गेलेल्या आहेत. कारखाना साईटवरील हमाल चाळीतील १,२,३ व ४ या चाळीतील सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे. सुरक्षा विभागातील मेनगेट ऑफीसच्या खिडक्याच्या काचा, खिडक्या याचे फुटून नुकसान झालेले आहे. कारखाना कॅन्टीच्या खिडक्याच्या काचा फुटून नुकसान झालेले आहे.
कारखाना साईटवरील बऱ्याच ठिकाणचे पोल पडलेले बरीच झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कारखाना साईटवरील विद्युत पुरवठा करणारे आहेत त्यामुळे विद्युत वाहक तारा व वायरींगचे तुटून अतोनात नुकसान झालेले असून एकूण अंदाजे रु. २.५० कोटी ते ३.०० कोटी रूपये पर्यंतचे नुकसान कारखान्याचे झालेले आहे.