विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या सदस्य पदासाठी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या सदस्य पदासाठी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता?

सोलापूर // प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य अडचणीत असलेल्या गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केला असून पक्षाचे धेय्यधोरणे जनमाणसांमध्ये पोहचवण्याचे काम केले आहे .

श्रीकांत शिंदे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून लवकरच श्रीकांत शिंदे यांची सदस्य पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मी आपल्या पक्षाचा एक कार्यकर्ता असून आपण मला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपवली असून त्यातून मी पूर्णवेळ पक्षकार्य करीत आहे.पक्षाच्या पडत्या काळात विविध कार्यक्रम आयोजित करत पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे आणि महादेव कोळी समाजाचे एकमेव पदाधिकारी आहेत की जो पक्ष स्थापनेपासून सक्रियपणे काम करत आहे. सध्या वरिष्ठ पातळीवरून सर्वच बाबतीतून श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत असल्याचे समजत आहे.

मंदिर समितीवर महादेव कोळी समाजासाठी एक जागा देण्यात येते.सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचा मी एकमेव पदाधिकारी महादेव कोळी समाजाचा आहे.पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्यपदी नियुक्त मिळालेस मला पक्ष कार्य करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल. तरी माझी सदस्यपदी नियुक्ती करावी अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here