विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखाना युनिट नं १ पिंपळनेर या कारखान्याचा २२ वा तर युनिट नं.२ करकंब ता.पंढरपूर या कारखान्याचा ४था”बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ”करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे तथा कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मा.श्री.संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते व माढा-पंढरपुर-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकासप्रिय आमदार मा.श्री.बबनरावजी दादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

तसेच युनिट नं १ येथे सर्वाधिक एकरी ऊसाचे उत्पादन घेणारे मौजे बेंबळे ता.माढा येथील ऊसउत्पादक सभासद मा.श्री.सोमनाथ भास्कर हुलगे व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.दिपाली सोमनाथ हुलगे यांचे शुभहस्ते व युनिट नं २ येथे मा.श्री.प्रकाश बापूराव पाटील रा.तुंगत ता.पंढरपूर व त्यांच्या पत्नी मा.सौ.पद्मजादेवी प्रकाश पाटील यांचे शुभहस्ते”श्री सत्यनारायण महापूजा”संपन्न झाली.

यावेळी मा.श्री.संजय पाटील भिमानगरकर, मा.श्री.रमेश पाटील, मा.श्री.शब्बीर जहागीरदार, मा.श्री.तानाजी पाटील,मा.श्री.आदिनाथ देशमुख, मा.श्री.प्रेम चव्हाण,मा.श्री.राहुल पुरवत, मा.श्री.भारत जाधव, मा.श्री. नारसा आप्पा देशमुख,मा.श्री.अंगद चीखलकर,मा.श्री.नवनाथ पवार, मा.श्री.गणपत पवार, मा.श्री.सत्यवान कारंडे, मा.श्री.शहाजी मुळे,मा.श्री.धनंजय मोरे,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक -एसएन.डीग्रजे साहेब,जनरल मॅनेजर-एस.आर.यादव,सर्व अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी, माढा,पंढरपूर,माळशिरस तालुक्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here