विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा चोख असल्याचा वैधमापन विभागाचा निर्वाळा युनिट नं.1 पिंपळनेर कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा चोख असल्याचा वैधमापन विभागाचा निर्वाळा

युनिट नं.1 पिंपळनेर कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी

वजन काटे तपासणी भरारी पथकातील अधिकारी यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील वजन काट्याची अचानक तपासणी केली असता वजनकाटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवित असून त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व ऊस वजन काटे योग्य असल्याचा निर्वाळा वैद्यमापन विभागाने दिला आहे.

याबाबत अधिक माहीती की, 09 फेब्रुवारी,2024 रोजी दुपारी 11.00 चे सुमारास श्री.अ.ध.गेटमे उपनियंत्रक वैध मापन शास्त्र अधिकारी, सोलापूर, व श्री.बी.एम. नांदे निरिक्षक , वैध मापन शास्र, कुर्डूवाडी विभाग यांचे भरारी पथकाने अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर ता.माढा येथील सर्व ऊस वजनकाट्याची तपासणी केली. ऊसाने भरलेल्या वाहनांचे वजन तपासले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. ऊस वजन बरोबर असल्याचे आढळून आले आहे. यावेळी भरारी पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व वजनकाटे चोख व अचूक वजन दर्शवित असल्याचे अहवालात नमुद करण्यात आहे.

सदरप्रसंगी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर ए.पी.माने,ऊस पुरवठा अधिकारी एन.एन. गायकवाड, ऊस उत्पादक शेतकरी व वाहनमालक उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here