विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर ऊस तोडणी मजूरांचे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण मोहीम!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठठ्लराव शिंदे कारखान्याचा सन 2022-23 चा गळीत हंगाम सुरू असून या गळीत हंगामात कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूकीसाठी आलेल्या मजूरांचे जनावरांना लाळ खुरकतचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कारखाना व पशुसंवर्धन विभाग, जि.प.सोलापूर यांचेमाध्यमातून लाळ खुरकत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा सन 2022-23 चा ऊस गळीत हंगाम सुरू असून या गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजूरांचे बैल, गाय, म्हैस व इतर जनावरांना लाळ खुरकतचा प्रादुर्भाव होवून जनावरे दगाविण्याचा संभव असल्याने कारखाना व पशुसंवर्धन विभाग, जि.प.सोलापूर यांचे माध्यमातून लाळ खुरकत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर लसीकरण मोहीमेचा शुभारंभ शनिवार दि.03/12/2022 रोजी कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. या लसीकरण मोहिमेमध्ये अंदाजे 3 हजार जनावरांना लाळ खुरकत लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच हंगामाचे सुरूवातीस कारखाना कार्यस्थळावर आलेल्या जनावरांना लम्पी या आजाराचे लसीकरण करण्यात आलेले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसे

याप्रसंगी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डॉ.सागर कदम,पशुधन विकास अधिकारी,पिंपळनेर,डॉ.बी.एन.सातव-पशुधन विकास अधिकारी, निमगांव(टे), ऊस तोडणी मजूर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here