विठ्ठलचा एक रुपया सुद्धा आमदारकीच्या स्वप्नावर उडविणार नाही हा माझा शब्द! अभिजित आबा पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलची गाडी रुळा वर आणण्याची संधी दिली तर सभासदांच्या व कामगारांच्या थकीत देयकाची पैपै चुकती तर करेनच पण भविष्यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी साठी लोकांनी संधी दिली तर सदर निवडणुकीत विठ्ठल चा एक रुपया सुद्धा वाया घालवणार नाही असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिपादन श्री.अभिजीत पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
विठ्ठल कारखान्याचे सभासद हे नव युवा नेतृत्व अभिजीत आबा पाटील यांच्या बाजूने एकतर्फी झुकलेले दिसत आहेत.तालुक्यातील तरुण वर्गाने अभिजीत पाटलांना अक्षरशः डोक्यावर घेतलेले दिसत आहे. सांगोला सहकारी साखर कारखान्यासह ०४ कारखाने यशस्वीपणे चालवून दाखविल्यामुळे बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्याबाबत आर्थिक दृष्ट्या कोमात गेलेल्या सभासदांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. अभिजीत आबांना एक संधी देऊन बघू अशी सर्वत्र प्रतिक्रिया उमटलेली दिसते. पंढरपूर सारख्या शेतकऱ्यांच्या तालुक्यात अभिजीत आबा नावाची लाट ऊसळलेली दिसते. फक्त विठ्ठलच्या सभासदांच्याच नव्हे, तर पंढरपूर मतदार संघातील प्रत्येक ओठावर अभिजीत आबा पाटील हे नांव कौतुकाने घेतले जात असताना दिसत आहे. या
पार्श्वभूमीवर ते पुढे म्हणाले कि,” ज्याच्या हातात सहकारी साखर कारखाना तो तालुक्याचा आमदार असे चुकिचे समीकरण झाले आहे. सभासदांच्या मालकीच्या सहकारी कारखान्यातून बेसुमार पैसे मिळवून ते चाड्यावर मूठ सोडल्या प्रमाणे स्वतःच्या आमदारकीच्या स्वप्नावर मुक्तहस्ताने ऊधळायचे. आणि शेतकऱ्यांची बीले व कामगारांचा पगार थकवून त्यांना देशोधडीला लावणे. हे कृत्य शेतक-र्यांच्या अन्नात माती कालविल्यासारखं असून असले पाप माझ्या हातून कदापि होणार नाही; विठ्ठलच्या प्रत्येक पैशावर फक्त कष्टकरी सभासद राजाचाच हक्क असून आमदारकीच्या स्वप्नावर विठ्ठल कारखान्याचा एकही पैसा मी उडवणार नाही; विठ्ठलचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मी जीवाचे रान करीन. सभासदांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी माझे प्रत्येक पाऊल असेल. भ्रष्टाचारी प्रवृत्तींना कारखान्याच्या आसपासही फिरकू देणार नाही,असे शपथपूर्वक सांगतो. सहकारी संस्थांमधील पैसा आमदारकी मिळविण्यासाठी उधळण्यामुळेच राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आलेले दिसतात.18 महीने रक्ताचं पाणी करुन रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्यांनी ऊस आणलेला असतो. त्याच्या घामाचा पैसा आमदारकीवर उडवण्याचा मला नैतिक अधिकार नाही. व ते पाप मी कधीही माथी घेणार नाही अशी ग्वाही देतो.”असे अत्यंत महत्त्वाचे व विठ्लच्या सभासदांच्या मनाचा ठाव घेऊन ज्यांची मने जिंकणारे प्रतिपादन श्री अभिजीत आबा पाटील यांनी आमच्याशी बोलताना केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here