वारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे

 

सोलापूर // प्रतिनिधी

वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय सांप्रदाय आहे. माझी वारी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत पायी दिंडी सोहळ्याला आम्ही फक्त वारकरी संघटनांचा पाठिंबा स्वीकारलेला आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि स्वीकारणार नाही असा निर्धार सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आहे वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा किती शिस्तीमध्ये चालतो हे पाहण्याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले राजकीय जोडे बाजूला काढून वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन एक दिवसापुरते का होईना आमच्यासोबत पायी चालावे. आम्ही त्यांचे स्वागत करु

पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व वारकरी संघटना एकत्र
वारकरी संप्रदायाची पायी परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व वारकरी संघटना एकत्र आलो आहोत ज्ञानोबा, तुकोबा पालखी सोहळ्या च्यासोबत असणाऱ्या दिंडी प्रमुखांचे फोन येत आहेत आम्हाला माझी वारी माझी जबाबदारी या अभियानातील दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे म्हणून सर्व संघटनांच्या सहमतीने प्रत्येक जिल्ह्यातील एक विणेकरी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

वारकऱ्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्याकरिता सेवाभावी संघटना येत आहेत पुढे
पायी दिंडी सोहळ्या मध्ये ज्या कुठल्याही गावांमध्ये मुक्काम न करता गावाच्या बाहेर मुक्काम करून तिथे भोजनाची व्यवस्था करण्याचे नियोजन चालू आहे पण वेळेवर नियोजन अवघड असल्यामुळे अनेक सेवाभावी संघटना पुढाकार घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्याकरता तत्पर असल्याचे दिसून येत आहे नाशिक येथील ह-भ-प श्री नितीन महाराज सातपुते अखिल विश्व वारकरी परिषद संस्थापक अध्यक्ष यांनी दिंडी सोहळ्या सोबत रुग्णवाहिका, व पाणी टँकर ची व्यवस्था करून दिलेली आहे व इतरही बऱ्याच सेवाभावी संघटना स्वतःहून पुढाकार घेऊन वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पायी दिंडी सोहळ्या मध्ये कमतरता भासणार नाही हा आभास करून देत आहे

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आषाढी पायी वारी ची परंपरा पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रचलित आहे पण मागील वर्षी कोरोना संकटाच्या मुळे पायी वारी रद्द करून संतांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला पाठवण्यात आल्या आणि याही वर्षी वेळोवेळी सर्व वारकरी संघटनांनी सरकारला पत्र दिल्यानंतर आमच्या भावनेचा विचार न करता पायी वारी रद्द करून आपण मागील वर्षीप्रमाणे वाहनाने पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय दिलेला आहे

सरकारने दिलेला निर्णय काही देवस्थानांनी जरी मान्य केला असेल पण सर्वसामान्य वारकऱ्यांना तो निर्णय मान्य नसून माझी वारी माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत आम्ही काही वारकरी संघटना एकत्र आलेल्या आहोता आणि आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत पायी पंढरपूरला जाण्याचा संकल्प केलेला आहे.
आमच्या संकल्पनेची चर्चा वृत्तपत्रा द्वारे टीव्ही न्यूज चैनल व्दारे पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मंडळींना कळल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत असणाऱ्या दिंडी प्रमुखांनी किमान एक वारकरी विणेकरी म्हणून आपल्या दिंडीत सहभागी करून घेण्याची इच्छा त्यांनी प्रगट केली आहे आणि आपण आपल्या नियोजनामध्ये आमचा सहभाग घेतला नाही तर आम्ही पायदळ पंढरपूरला जाणार होतच असे काही वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

आम्ही येणाऱ्या भाविकांना सांगितलेले आहे. आम्ही कोणत्याही वारकऱ्यांची मुक्काम,चहा,नाश्ता, भोजनाची व्यवस्था करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर आमच्या नियोजनातील दिंडी सोहळ्या मध्ये तुमच्या दिंडीतील फक्त एक व्यक्ती विणेकरी सहभागी होवु शकतो. दिंडी मधे पायी चालणारे वारकरी आम्ही मुक्कामाची व्यवस्था गावाच्या बाहेर करणार आहोत

दिंडी मधे सहभागी व्यक्तीला कोरोना चे निगेटिव रिपोर्ट सोबत राहतील व कोरोनाचे सर्व नियम व अटी मान्य राहतील .
शांततेने ,शिस्तबद्धपणे आणि बायोबबल पद्धतीने हा दिंडी सोहळा निर्विघ्न पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आमच्यासोबत कुठल्याही संतांच्या पादुका नसल्यामुळे बाहेर गावातील गावकरी दिंडी मध्ये दर्शनाकरिता गर्दी करणार नाही व आम्ही गावकऱ्यांना तसे आवाहन सुद्धा करणार आहोत आणि दिंडी मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या जवळुन रीतसर आम्ही जे नियमावली तयार केली आहे त्या नियमाचा अर्ज भरुन घेणार आहोत

आळंदी येथुन दिंडी निघण्याच्या वेळेला रीतसर ज्यांची नोंदणी आमच्याजवळ झाली त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने ओळखपत्र देणार आहोत

तरी सरकारने ,प्रशासनाने वारकऱ्यांच्या शिस्तीवर, नियमावली वर कुठल्याही प्रकारचा संशय न घेता आम्हाला पाचशे वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडी सोहळ्याच्या करीता रितसर परवानगी द्यावी ही विनंती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here