वाचनालयाला दिली ५० हजारांच्या पुस्तकांची भेट प्रांताधिकारी गुरव, तहसीलदार बेल्हेकर यांच्याकडून विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचनालयास बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ५० हजारांचे विविध स्पर्धा परीक्षांची  पुस्तके तसेच कपाट प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी भेट दिले.

यावेळी कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अरुण पवार, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शिलरत्न झेंडे, माजी नगरसेवक सुनील सर्वगोड तसेच जितेंद्र बनसोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

जिथे ज्ञानाचा सागर संचित करून इतरांचे वैचारिक भूक भागविली जाते त्या चार भिंतींच्या आड असलेल्या वाचनालयाला दिलेले दान हेच परोपकारी ठरणारेअसून,  वाचनालयामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे जीवन फुलते हाच आशावाद अंगी बाळगून प्रांताधिकारी गुरव व तहसिलदार बेल्हेकर यांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडले.

         शासकीय भरती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा लाभ होईल तसेच विद्यार्थी हा मोबाईलच्या युगात पुस्तक प्रेमी होईल. या वाचनालयात विद्यार्थ्यांना व  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना  स्पर्धा परीक्षांचा उपलब्ध पुस्तकांचा वाचनाचा लाभ घेऊन विविध स्पर्धा परीक्षेचे यश संपादित करावे असे ,आवाहन .बेल्हेकर यांनी  यावेळी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here