पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी या कारखान्याने सन 2018- 2019 व 2020-2021सालातील थकीत एफआरपी व 15 टक्के व्याजासहीत द्यावे अशी मागणी ॲड. श्री. दीपक दामोदर पवार यांनी साखर सह संचालकांकडे केली होती.
उक्त संदर्भान्वये मा. संचालक (अर्थ) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रासोबत ॲड. श्री. दिपक दामोदर पवार, रा.जैनवाडी ता.पंढरपूर यांचे विषयअंकित निवेदन या कार्यालयास प्राप्त झाली आहे.
सदर निवेदनात श्री पवार यांनी सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सह. कारखाना लि. भाळवणी या कारखान्याचे सन 2020-21 मधील संपूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना मिळालेली नसून, विलंब कालावधीसाठी 15% व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना मिळावी तसेच 2018-19 या हंगामातील एफआरपी देखील कारखान्यांनी पूर्णपणे दिलेली नाही असे नमूद केले होते
यावेळी बोलताना ॲड. श्री. दिपक पवार म्हणाले की; सदर निवेदनात विषययांकित कारखाने सन 2018-19 मधील एफआरपी रू.77 प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना दिली नाही व विलंब कालावधीचे देखील व्याज दिलेले नसल्याचे अशी मागणी केली होती त्याला साखर सहसंचालकांनी उत्तर दिले असून लवकरच सर्व सभासद शेतकऱ्यांना सहकारी शिरोमणी कडून राहिलेले ऊसाचे बील मिळेल असे मत व्यक्त केले.